उच्च रक्तदाबाच्या गोळ्या होतील एका झटक्यात बंद! 'या' पद्धतीने नियमित खा लसूण पाकळ्या
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे आणि लक्षणे?
हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
लसूण खाण्याचे फायदे?
जगभरात उच्च रक्तदाब, हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजारांनी असंख्य लोक त्रस्त आहेत. हृदयरोगाची लागण शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे होते. दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये आवश्यक चरबीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. पिवळ्या रंगांचा चिकट थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो. रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट ब्लॉकेज यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम संपूर्ण शरीराच्या कार्यावर लगेच दिसून येतो. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशावेळी आहारात नियमित लसूण खावी. (फोटो सौजन्य – istock)
जेवणातील सर्व पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूण खाल्ल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध वाढवण्यास मदत करते. उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर नियमित दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. लसूणमध्ये सक्रिय संयुग ॲलिसिन नावाचा शक्तिशाली घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. रिकाम्या पोटी कच्ची लसूण खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.
थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लसूण खावा. यामध्ये असलेले शक्तिशाली ॲलिसिन संयुग जीवाणू, विषाणू आणि इतर संसर्गाशी लढण्यास मदत करते. तसेच सर्दी खोकला आणि इतर आजारांपासून सुटका होते.
उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित दोन पाकळ्या लसूण खावी. याशिवाय तुपात किंवा मधात मिक्स केलेली लसूण सुद्धा तुम्ही खाऊ शकता. लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
बऱ्याचदा चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे आणि सतत मसालेदार पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया कमकुवत होऊन जाते. पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. अशावेळी उपाशी पोटी कच्ची लसूण खावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते.
Ans: कोलेस्टेरॉल हा रक्तात आढळणारा एक मेणासारखा, चिकट पदार्थ आहे जो पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो, पण त्याचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन समस्या निर्माण करतो.
Ans: वाईट' कोलेस्टेरॉल, चांगले' कोलेस्टेरॉल
Ans: गंभीर परिस्थितीत छातीत दुखणे, धाप लागणे, किंवा हृदय धडधडणे ही लक्षणे दिसू शकतात, जे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.






