Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

रक्ताच्या गाठी झाल्यानंतर पायांमध्ये वेदना किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण हीच लक्षणे गंभीर आजारांचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया रक्ताच्या गाठी होण्याची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 05:30 AM
पायांवर दिसून येणाऱ्या 'या' रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पायांवर दिसून येणाऱ्या 'या' रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

रक्ताच्या गाठी होण्याची कारणे?
कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी?
पॅनक्रियाज कॅन्सर म्हणजे काय?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा कळत नकळत परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फायद्याचे ठरते. मागील काही वर्षांपासून जगभरात कॅन्सर रुग्णाची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. त्यातील अतिशय उशिरा निदान होणारा कॅन्सरचा प्रकार म्हणजे पॅनक्रियाज कॅन्सर. या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सौम्य आणि सामान्य वाटणारी असतात. त्यामुळे फारसे लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने लक्षणे वाढतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये पायात लक्षणे दिसू लागतात. सतत सूज येणे, वेदना होणे, त्वचेचा रंग बदलणे किंवा गाठी जाणवणे इत्यादी सामान्य वाटणारी लक्षणे जीवावर बेतात. कॅन्सर झाल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो. साधी वाटणार लक्षणेच मोठ्या आजारांचे कारण बनतात. आज आम्ही तुम्हाला पायांवर काळ्या निळ्या रेषा का दिसतात? रक्ताच्या गाठी कशामुळे होतात? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

पायांमध्ये दिसणारी धोक्याची लक्षणे:

कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला पायांमध्ये असामान्य वाटणारी पण धोक्याची लक्षणे दिसू लागतात. पायांना वारंवार सूज येणे, गाठी येणे, पायांमध्ये रक्त गोठणे, पायांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय निळ्या रेषा आलेल्या भागात उष्णता जाणवणे. ही लक्षणे व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजेच DVT झाल्यानंतर दिसू लागतात. पायातील खोल शिरेत रक्ताची गाठ तयार झाल्यानंतर पायांवर दिसणाऱ्या नसांचा रक्तपुरवठा खंडित होतो, ज्याच्या परिणामामुळे पायांवर निळ्या काळ्या रेषा दिसू लागतात.

रक्ताची गाठ फुफ्फुसांपर्यंत जाणे धोक्याचे:

शरीरात तयार झालेल्या गाठींचा तुकडा फुटून काहीवेळा फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकून बसतो. ज्याच्या परिणामामुळे श्वास घेताना अडचण येणे, थकल्यासारखे वाटते, छातीमध्ये वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याला वैद्यकीय भाषेत पल्मनरी एम्बोलिझम असे म्हणतात. या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. पॅनक्रियाज कॅन्सर झाल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

रक्ताच्या गाठी तयार होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. कॅन्सरच्या उपचारादरम्यान केली जाणारी केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया यामुळे रक्ताच्या गाठी वाढतात. आनुवंशिक आजार, इस्ट्रोजेन असलेली गर्भनिरोधक गोळी, व्हेरिकोज व्हेन्स, आधी गाठ झाल्याचा इतिहास, लठ्ठपणा किंवा सतत धूम्रपान केल्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी वाढण्याची जास्त शक्यता असते. पोटाच्या आत, पाठीचा कणा आणि पोट इत्यादीमध्ये पॅनक्रियाज ग्रंथीतील पेशी अनियंत्रित वाढू लागल्यानंतर कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वादुपिंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणून याला 'सायलेंट कॅन्सर' म्हणतात. नंतरच्या टप्प्यात वजन कमी होणे, भूक न लागणे, कावीळ.

  • Que: स्वादुपिंडाचा कर्करोग कशामुळे होतो?

    Ans: हे अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे (genetic mutations) होते, ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते। धूम्रपान, मधुमेह, स्वादुपिंडाची जुनी सूज (Chronic Pancreatitis), आणि लठ्ठपणा हे घटक धोका वाढवतात.

  • Que: स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे मुख्य उपचार काय आहेत?

    Ans: ट्यूमर काढून टाकण्यासाठी, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, ट्यूमर लहान करण्यासाठी

Web Title: Do not ignore these lines that appear on the legs risk of serious diseases related to the body know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Early Breast Cancer: स्‍तनाच्‍या कर्करोगाच्‍या सुरुवातीच्या काळात जवळच्या माणसांचा पाठिंबा गरजेचा, काय सांगतात तज्ज्ञ
1

Early Breast Cancer: स्‍तनाच्‍या कर्करोगाच्‍या सुरुवातीच्या काळात जवळच्या माणसांचा पाठिंबा गरजेचा, काय सांगतात तज्ज्ञ

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
2

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत
3

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन
4

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.