रक्तदान केल्यामुळे शरीराला होतात 'हे' चमत्कारीक फायदे
दरवर्षी सगळीकडे 14 जूनला जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. रक्तदान करण्यासाठी लोक प्रेरित व्हावे, यासाठी रक्तदान दिवस साजरा केला जातो. रक्तदान करणे हे अतिशय पुण्याचे मानले जाते. कारण एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक आहे. रक्ताच्या प्रत्येक युनिटमुळे तीन जीव वाचू शकतो. हे आपल्यातील अनेकांना आजवर कधीच माहित नसेल. याशिवाय सहा महिन्यातून एकदा रक्तदान केल्यामुळे शरीरात नवीन रक्त तयार होते. रक्तदान केल्यानंतर त्यातील रक्त लाल रक्तपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगवेगळ्या केल्या जातात. त्यानंतर रुग्णाच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय गोष्टींसाठी वापरले जाते. रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, कर्करोगाचे रुग्ण, शस्त्रक्रियेदरम्यानचे रुग्ण आणि दीर्घकालीन रक्त आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्तदन केलेले रक्त वापरले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तदान केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
रक्तदान केल्यानंतर शरीरामध्ये २४ तासांत रक्तातील द्रव घटक पुन्हा नव्याने भरले जातात. तसेच रक्तदान केल्यानंतर शरीरातील लाल रक्तपेशी वाढण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे घाबरून जाऊन नये. एखादी निरोगी व्यक्ती दर सहा किंवा तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकते. तर महिला दर चार महिन्यांनी रक्तदान करू शकता. रक्तदान करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. यासाठी फक्त १० मिनिटांचा वेळ लागतो. याशिवाय तपासणी आणि विश्रांतीसाठी सुमारे 30 -45 मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता असते.
प्रत्येक निरोगी व्यक्तीला रक्तदान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांनीच रक्तदान करावे, असे काही नाही. प्रत्येक रक्तगट अतिशय महत्वाचा असतो. कारण अपघात, प्रसूतीकाळ किंवा दुखापतींपर्यंत सर्वच गोष्टींसाठी रक्ताची आवशक्यता भासते. त्यामुळे प्रत्येक रक्तगट हा अतिशय महत्वाचा आहे. वय 18 ते 65 वर्षा दरम्यान प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकते. वजन आणि हिमोग्लोबिन योग्य असलेली व्यक्ती दर महिन्यांनी रक्तदान करू शकते.
तीन महिन्यातून एकदा रक्तदान केल्यामुळे शरीरात वाढलेली लोहाची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदान केल्याने अंदाजे 600 -650 कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे चार महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावे. रक्तदान केल्यामुळे लाल रक्तपेशींच्या उत्पादनास गती मिळते, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचा रक्तदाब, हिमोग्लोबिन पातळी आणि नाडी तपासली जाते.