रात्री झोपण्याआधी चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. रोजच्या आहारात ताज्या ताज्या फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आहारात फळे खाल्यामुळे शरीर निरोगी राहते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यातील तुम्ही कोणतेही फळं नियमित खाल्यास आरोग्यासोबतच त्वचेचे आरोग्यसुद्धा निरोगी राहण्यास मदत होईल. पण फळांचे सेवन योग्य वेळी करणे आवश्यक आहे. चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शक्यतो रात्रीच्या वेळी फळांचे सेवन करू नये. यामुळे पचनासंबंधित समस्या,वजन वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळे खाऊ नयेत. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात द्राक्ष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. द्राक्षाचे सेवन केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. पण रात्रीच्या वेळी द्राक्ष खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. द्राक्षांमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हार्टबर्न होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी द्राक्षाचे सेवन करू नये. झोपण्यापूर्वी द्राक्ष खाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री द्राक्ष खाऊ नये.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगडाला बाजारात मोठी मागणी असते. कलिंगड खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. शिवाय यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी आढळून येते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्यामुळे सतत लघवीला जावे लागते. यामुळे झोप मोड होऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी पचनक्रिया हळूहळू होत असल्यामुळे पचनास जड पदार्थ खाऊ नये.
विटामिन सी युक्त संत्र आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. संत्र्याचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील डाग,पिंपल्स निघून जातात आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागते. पण यामध्ये असलेल्या ऍसिडचा वापरीत परिणाम पचनसंस्थेवर होण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी संत्र खाल्यामुळे पोटात जळजळ होणे, पॉट दुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आंबट गोड चवीचे पेरू सगळ्यांचं खूप आवडतात. पेरू खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते कारण यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येते. पण रात्रीच्या वेळी पेरूचे सेवन करू नये. पेरू खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटात दुखणे, पोट जड होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच यामुळे रात्री झोपसुद्धा लागत नाही. म्हणून सकाळ किंवा दुपारच्या वेळी पेरूचे सेवन करावे.