युरिक अॅसिड कमी करण्यासाठी पपईचे करा सेवन
शरीरात सातत्याने होणारे बदल, चुकीचा आहार, अपुरी झोप, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. शिवाय यामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक अॅसिड सांध्यांमध्ये जमा झाल्यानंतर हाताची बोट दुखणे, हात पाय वाकडे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरामध्ये युरिक अॅसिडची पातळी वाढणे ही एक सामान्य समस्या असून हा त्रास वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुमहाला सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप आवडते. पपई खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरामध्ये प्युरीन, स्टार्च आणि फॅट्स अन्नपदार्थांमधून युरिक अॅसिड तयार करतात. जे शरीरासाठी हानिकारक आहे. इत्यादी हानिकारक पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. त्यामुळे रोजच्या आहारात पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात.
पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पिकलेला पपई खाण्याऐवजी कच्च्या पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होईल. पपईमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज, स्टार्च आणि प्युरिनचे प्रमाण आढळून येते, ज्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे
बाजारात सर्वच ऋतूंमध्ये पपई उपलब्ध असतात. पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात पपईचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेले पपई तुम्ही बारीक तुकडे करून किंवा ज्युस करून पिऊ शकता. यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल. शिवाय कच्च्या पपईचे सेवन तुम्ही पपईची भाजी, पपईची चटणी किंवा पपईची कोशिंबीर बनवून दिवसभरातून एकदा खाऊ शकता.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कच्ची पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे पपईचे नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही कच्च्या पपईचा ज्युस रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. पपईचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपई सोलून त्यातील बिया काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी घालून बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्या. यामुळे पपई व्यवस्थित शिजेल. त्यानंतर पपईचा रस काढून त्यात काळं मीठ टाकून प्या. यामुळे युरिक अॅसिडची पातळी कमी होईल.