
शिड्या चढल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
शिड्या चढल्यानंतर दम का लागतो?
शिड्या चढण्याची योग्य पद्धत?
फुफ्फुसांची समस्या कशामुळे उद्भवते?
धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, जंक फूडचे सेवन, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप, शारीरिक हालचालीचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कामाच्या गडबडीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. शिड्या चढताना किंवा उतरताना खूप जास्त थकवा आणि दम लागतो. १०-१२ शिड्या चढल्यानंतर लगेच थकवा जाणवत असेल तर ही सामान्य समस्या नाही. दम लागणे हे सामान्य आजाराचे संकेत नसून शरीरसंबंधित गंभीर आजरांची लक्षणे आहेत. फुफ्फुसांच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते.तसेच शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
शिड्या चढताना तुम्हाला जर वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरात अनेक सामान्य बदल दिसून येतात. या बदलांकडे वेळीच लक्ष न दिल्यास फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा फुफ्फुस निकामी होण्याची जास्त शक्यता असते. फुफ्फुसांच्या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. वाढलेले वजन आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळ्वण्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही
शरीरात वाढलेल्या अनावश्यक चरबीच्या थरांमुळे वजन वाढू लागते. वजन वाढू लागल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि इतर आजार होतात. तसेच फुफ्फुसांच्या भितींवर जास्त वजन पडते. ज्यामुळे श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होतो. तसेच दारू किंवा सिगारेट ओढल्यामुळे क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होतात. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुस पूर्णपणे निकामी होतात. त्यामुळे शिड्या चढताना खूप जास्त त्रास होतो. याशिवाय हृदयाचे आरोग्य बिघडल्यानंतर श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होतो. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी हलकेसे चालल्यानंतर किंवा शिड्या चढताना श्वास घेण्यास त्रास होतो.
काहींना घाई घाईमध्ये शिड्या चढण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे हृदयावर जास्त तणाव येतो. त्यामुळे शिड्या चढताना एक एक पायरी चढाव्यात. तोंडाने श्वास घेण्याऐवजी नाकानं दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने हळुवार श्वास घ्यावा. प्रत्येक १० ते १२ पायऱ्यांनतर थोडा वेळ थांबून श्वास घेतल्यास दम लागणार आणि श्वसनाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
Ans: श्वास घेण्यास त्रास होणे.छातीत अस्वस्थता किंवा वेदना.
Ans: सिगारेटचा धूर आणि सेकंडहँड स्मोक.जिवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होणारे संक्रमण
Ans: नियमितपणे चालणे, धावणे, योगासने (प्राणायाम) आणि पोहणे.