
दह्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये पीळ बसून उद्भवतील पचनाच्या समस्या
आंबटगोड दही खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दह्याचे सेवन केले जाते. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दह्याचे सेवन केल्यास पचनक्रिया निरोगी राहील आणि चेहऱ्यावर ग्लो येईल. जेवणताना अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय दिवसभरात तिखट, तेलकट, आंबट इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. प्रत्येक पदार्थांचा आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. चुकीचे कॉम्बिनेशन असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. काहींना दह्यासोबत फळे खाण्याची सवय असते, तर अनेक लोक चिकन बनवताना दह्याचा वापर करतात. पण दह्यासोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून आतड्याना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा
दही आणि दूध एकत्र खाल्ल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. दोन्ही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि ते पचन होण्यासाठी वेगळी प्रक्रिया असते. दूध आणि दही एकत्र खाल्यामुळे आतड्यांमधील असंतुलन वाढते आणि गॅस, ऍसिडिटीचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे दह्यासोबत एकत्र दूध किंवा दही कोणताही एकच पदार्थ खावा. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया बिघडून शरीराला हानी पोहचेल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. सफरचंद, संत्री, केळी, कलिंगड इत्यादी अनेक वेगवेगळ्या आंबट गोड फळांचे कायमच सेवन केले जाते. पण फळांसोबत दह्याचे अजिबात सेवन करू नये. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळून येते तर फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि अॅसिडिक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे दह्यासोबत फळे एकत्र करून खाल्ल्यास आतड्यांमध्ये बॅक्टरीया वाढून ऍसिडिटी आणि गॅस निर्माण होतो. याशिवाय काहीवेळा पोटाला सूज येण्याची शक्यता असते.
टोमॅटो, लिंबू, चिंच, कोकम इत्यादी आंबट पदार्थांसोबत दही अजिबात खाऊ नये. काहींना टोमॅटोची चटणी बनवल्यानंतर त्यात दही टाकण्याची सवय असते. पण टोमॅटो आणि दही एकत्र मिक्स करून खाल्ल्यामुळे पोटात आम्ल्पित्त वाढते. याला ‘लीकी गट सिंड्रोम’ असे सुद्धा म्हणतात. टोमॅटो आणि दह्याचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनतंत्र कमजोर होऊ शकते.
दहीसोबत काय खाणे टाळावे?
अंडी आणि मासे हे पदार्थ पचायला जड असतात आणि दह्यासोबत खाल्ल्यास पचनावर अधिक ताण येतो. आंबट फळे, जसे की लिंबूवर्गीय फळे दह्यासोबत खाणे टाळावे, कारण यामुळे पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो आणि अॅसिडिटी वाढू शकते.
पचन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
पचन म्हणजे खाल्लेले अन्न शरीरात ऊर्जा आणि पोषणासाठी रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे. यात अन्न चावणे, गिळणे, लहान आणि मोठ्या आतड्यातून प्रवास करणे आणि शेवटी उत्सर्जनाद्वारे बाहेर टाकणे समाविष्ट आहे.
पचनाच्या समस्या कशा ओळखाव्यात?
पोटात जळजळ, वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे.पोट फुगणे, गॅस होणे किंवा ढेकर येणे. शौचाच्या सवयीत बदल होणे.