• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These 5 Things Will Save You From Brain Stroke Relief From Experts

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा

ब्रेन स्ट्रोक नाव जरी वाचलं तरी पायाखालची जमीन सरकते. सध्या अनेक तरूणांनादेखील या आजाराला सामोरे जावे लागत आहे. २९ ऑक्टोबर रोजी जगभरात ब्रेन स्ट्रोक डे साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 28, 2025 | 01:08 PM
ब्रेन स्ट्रोकबाबत माहिती (फोटो सौजन्य - iStock)

ब्रेन स्ट्रोकबाबत माहिती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ब्रेन स्ट्रोक डे का साजरा केला जातो 
  • ब्रेन स्ट्रोक येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी 
  • ब्रेन स्ट्रोकवर जागरुकता 
मेंदूच्या एखाद्या भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडथळा आला किंवा रक्तपुरवठा कमी झाला तर ब्रेन स्ट्रोक येतो. धमनीमध्ये किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे इस्केमिक स्ट्रोक होतो. मेंदूमध्ये रक्तवाहिनीत बिघाड झाल्याने किंवा ती फुटल्याने होणारा रक्तस्त्राव हे स्ट्रोकचे अजून एक कारण असते. या दोन्ही केसेसमध्ये मेंदूला आवश्यक तितका रक्तपुरवठा आणि पोषकतत्त्वे मिळत नाहीत, त्यामुळे मिनिटभरात रक्तातील पेशी मरण पावू लागतात.

स्ट्रोक ही गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. त्याकडे तातडीने लक्ष दिले जाणे अत्यंत आवश्यक असते. पण चांगली बाब अशी की निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून आपण स्ट्रोक होण्याचा धोका कमी करू शकतो. डॉ. अभिजित कुलकर्णी, कन्सल्टंंन्ट, न्यूरोसर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

आरोग्याला पूरक आहार घेणे

मेंदू निरोगी राखायचा असेल तर संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, मेद नसलेली प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स यांचा समावेश असलेला आहार नियमितपणे घेतल्यास स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. सोडियमचे (मीठ) सेवन कमी प्रमाणात केल्यास, ट्रान्स फॅट्स टाळल्यास तुमचा रक्तदाब व्यवस्थित राहतो.  रक्तदाब वाढणे हे स्ट्रोक होण्याचे एक कारण ठरू शकते.

ब्रेन स्ट्रोक येण्यपूर्वी शरीर देतो काही संकेत… लक्षात येताच घ्या डॉक्टरांची धाव

सक्रिय राहणे

तुमची जीवनशैली जर सक्रिय असेल तर तुम्ही स्ट्रोकला प्रतिबंध घालू शकता. नियमितपणे व्यायाम केल्याने हायपरटेन्शन, मधुमेह आणि स्थूलपणा असे जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळता येतात, हे आजार स्ट्रोकचा धोका वाढवतात. दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम किंवा ७५ मिनिटे जोमदार ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम करावा, त्याबरोबरीने दर आठवड्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम, कामे करावीत.   

धूम्रपान बंद करा आणि अल्कोहोलचे सेवन कमी प्रमाणात करा

हे फार महत्त्वाचे आहे. धूम्रपान स्ट्रोकला कारणीभूत ठरते. धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, इतकेच नव्हे तर रक्त घट्ट होते आणि धमन्यांमध्ये प्लाक निर्माण होणे वाढते. धूम्रपान सोडल्याने स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. अति प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने रक्तदाब वाढतो, हृदय निकामी होऊ शकते आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो. अल्कोहोलचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

नियमितपणे आरोग्य तपासणी 

नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहिल्यास, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यासारख्या समस्या असल्यास त्यांचे लवकरात लवकर निदान करता येते आणि तातडीने उपचार केले जाऊ शकतात. या आजारांवर वेळीच उपचार केल्याने स्ट्रोकचा धोका खूप प्रमाणात कमी होतो.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या

ताणतणाव कमी करा

खूप जास्त ताणतणाव असतील तर स्ट्रोकचा धोका वाढतो. समाधानी राहणे, ध्यानधारणा, योग आणि दीर्घ श्वसन यासारखी तंत्रे लाभदायक ठरू शकतात. झोप पुरेशी आणि नीट होत नसेल तर रक्तदाब आणि जळजळ यासारखे त्रास होतात, त्यामुळे स्ट्रोकचा धोका अजून वाढतो, त्यामुळे रोजच्या रोज पुरेशी व शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे.

आजाराला प्रतिबंध घालणे हे त्यावर उपचार करण्यापेक्षा चांगले असते. स्ट्रोकची लक्षणे आणि चिन्हे याबाबत नीट माहिती करून घेतली पाहिजे. स्ट्रोक होत आहे हे जितक्या लवकर समजेल आणि ‘गोल्डन अवधी’ मध्ये वैद्यकीय मदत मिळाली तर मेंदूचे नुकसान कमीत कमी होईल हे सुनिश्चित करून व्यक्ती पूर्णपणे बरी होण्याची शक्यता वाढते.

निरोगी जीवनशैलीचे आचरण करून आणि योग्य माहिती जाणून घेऊन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो व तुम्ही निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला असलेल्या धोक्यांबाबत तसेच स्ट्रोक कसा टाळता येईल याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोला. जीवनशैलीमध्ये साधे पण प्रभावी बदल घडवून आणून तुम्ही मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करून अधिक चांगले जीवन जगू शकता.

Web Title: These 5 things will save you from brain stroke relief from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips

संबंधित बातम्या

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 
1

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 

दारू नाही तर ‘या’ 1 पेयाने सडू शकते Kidney, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला इशारा
2

दारू नाही तर ‘या’ 1 पेयाने सडू शकते Kidney, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला इशारा

10000 कॅलरी रोज खाऊन रशियन इन्फ्लुएन्सरचा झोपेतच झाला मृत्यू, वजन कमी-जास्त करण्यासाठी 1 चूक ठरू शकते जीवघेणी
3

10000 कॅलरी रोज खाऊन रशियन इन्फ्लुएन्सरचा झोपेतच झाला मृत्यू, वजन कमी-जास्त करण्यासाठी 1 चूक ठरू शकते जीवघेणी

1 इंजेक्शन आणि आयुष्यभरासाठी नसांमध्ये चिकटलेले घाण कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर, Game Changing औषध लवकरच येणार
4

1 इंजेक्शन आणि आयुष्यभरासाठी नसांमध्ये चिकटलेले घाण कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर, Game Changing औषध लवकरच येणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अनुभवली NASA ची सफर; 12 दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अनुभवली NASA ची सफर; 12 दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट

Dec 04, 2025 | 02:35 AM
भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

Dec 04, 2025 | 02:00 AM
भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

Dec 04, 2025 | 01:15 AM
रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

Dec 03, 2025 | 11:23 PM
‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

Dec 03, 2025 | 11:07 PM
IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

Dec 03, 2025 | 10:49 PM
‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

Dec 03, 2025 | 10:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.