औषध न घेता कमी होईल रक्तातील साखर! सकाळी उपाशी पोटी करा 'या' पेयांचे सेवन
मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीराचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसून येतात. थकवा, अशक्तपणा, अंगाला खाज येणे किंवा कधीही चक्कर आल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढून शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?
मधुमेह हा ‘सायलेंट किलर’ आजार आहे. कारण या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात लवकर लक्षणे दिसून येतात. पण कालातंराने मधुमेह वाढून शरीरातील अवयव खराब होऊन जातात. मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण यामुळे केवळ रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पण मधुमेहाची समस्या मुळांपासून नष्ट करण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या ओएयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे केवळ मधुमेहच नाहीतर संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात.
चवीला कडू असलेलं कारलं कोणालाही खायला आवडत नाही. पण कराल खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कारल्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि साखर नियंत्रणात राहते. कारल्याच्या रसात चॅरँटिन आणि पॉलीपेप्टाइड-पी घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करावे, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
जेवण बनवताना वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातील लोकप्रिय मसाला म्हणजे दालचिनी. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारेल. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक इन्सुलिनची भूमिका बजावतात. टोपात पाणी गरम करून त्यात बारीक तुकडा दालचिनी टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी उपाशी पोटी प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि आरोग्य सुधारेल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तवाहिन्या कायमच निरोगी राहतात आणि नेफ्रोपॅथी किंवा रेटिनोपॅथीसारख्या गुंतागुंती टाळता येतात.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह एक अशी स्थिती आहे, जेव्हा शरीरात ग्लुकोज (रक्तातील साखर) वाढते. हे एकतर स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नसल्यामुळे होते किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.
मधुमेहावर उपचार कसे करावे?
संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये फायबरयुक्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा. जास्त साखर आणि चरबी असलेले पदार्थ टाळा.नियमित व्यायाम करा, जसे की दररोज ३० मिनिटे चालणे किंवा योगा करणे. यामुळे शरीरातील ग्लुकोजचा वापर सुधारतो.
टाइप २ मधुमेहासाठी कोणती औषधे वापरली जातात?
मेटफॉर्मिन (Metformin) हे टाइप २ मधुमेहासाठी वापरले जाणारे एक सामान्य औषध आहे. ते यकृताद्वारे बनवलेल्या ग्लुकोजचे प्रमाण कमी करते आणि शरीराला इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते.






