सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. अन्न, निवारा आणि पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात., शरीर हायड्रेट राहते, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता आणि कुठूनही बाहेरून आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला पाणी पिण्याची सवय असते. पाणी प्यायल्याशिवाय तहान कमी होते. अशावेळी अनेक लोक थंड पाण्याचे सेवन करतात. थंड पाणी प्यायल्यामुळे तहान कमी होते पण शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला वाढतो.(फोटो सौजन्य – iStock)
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय असते. कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तहान लागल्यानंतर थंड पाणी जेवढ्या प्रमाणात प्यायले जाते तेवढेच कोमट पाणी सुद्धा प्यायले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्याचे सेवन करण्याऐवजी कोमट किंवा साध्या पाण्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे लिव्हर आणि किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. लिवाहरमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे नियमित शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाते. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर पडून जातात. मुत्रपिंड आणि फुप्फुसाच्या आरोग्यासाठी कोमट पाणी अतिशय प्रभावी आहे.
आतड्यांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ होते. आतड्यांमध्ये दीर्घकाळ साचून राहिलेल्या घाणीमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेक लोक कोमट पाण्याचे सेवन करतात. यासोबतच तूप टाकून कोमट पाण्याचे सेवन केले जाते. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय यामुळे शरीराची सूज कमी होते, रक्तभिसरण सुधारते, डोके दुखी आणि मायग्रेनच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो.