शरीरातील घाणीमुळे आतड्यांवरील आलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
शरीरात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, बिघडलेली जीवनशैली, मसालेदार पदार्थांचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे इत्यादी अनेकगोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पचनशक्ती कमजोर होऊन जाते. पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आतड्यांवर ताण येऊ लागतो. यामुळे शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे पोटात गॅस होणे, अपचन होऊ लागते. बऱ्याचदा अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच बद्धकोष्ठतेपासून नैसर्गिक सुटका मिळेल.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोजच्या आहारात पेरूचे नियमित सेवन करावे. कारण पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण सहज बाहेर पडून जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास चालना देतात. बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्येपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी नियमित पेरू खावेत. तसेच पेरूच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नियमित ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात ताक किंवा दह्याचे सेवन करावे. बऱ्याचदा अपचन, मळमळ किंवा इतर पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यास जिरं घालून तयार केलेले ताक प्यावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. रोजच्या आहारात ताकाचे नियमित सेवन करावे.
अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा ‘हे’ प्राणायाम, हायपरटेंशनची समस्या होईल कायमची दूर
गोड पदार्थ बनवताना मनुक्यांचा वापर केला जातो. मनुके खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मनुक्यांचे पाणी प्यावे. एक ग्लास पाण्यात ५ किंवा ६ मनुके भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया बिघडत नाही. याशिवाय आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मनुक्यांचे पाणी प्यावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लोह आढळून येते, ज्यामुळे शरीराची पचन क्रिया सुधारण्यासोबतच शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते.