किडनी चांगली राखण्यासाठी किती पाणी प्यावे (फोटो सौजन्य - iStock)
मूत्रपिंडाच्या योग्य कार्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. भरपूर पाणी पिल्याने शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मूत्रपिंडांना गाळण्यात जास्त मेहनत करावी लागत नाही. म्हणून, तुम्ही दिवसभरात ३ लिटर पाणी प्यावे. पाण्यासोबतच, तुम्ही तुमच्या आहारात इतर द्रवपदार्थांचाही समावेश करू शकता.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु एकाच वेळी भरपूर पाणी पिणे मूत्रपिंडांसाठी चांगले नाही. यामुळे मूत्रपिंडांवर दबाव येतो. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोक सकाळी उठल्याबरोबर एकाच वेळी १-२ बाटल्या पाणी पितात. डॉक्टर ही सवय योग्य मानत नाहीत. सकाळी एकाच वेळी इतके पाणी पिल्याने किडनीवर दबाव येतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकाळी किती पाणी प्यावे हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
सकाळी किती ग्लास पाणी प्यावे?
सकाळी उठल्यावर किती ग्लास पाणी पिऊ शकता
PSRI चे नेफ्रोलॉजी प्रमुख, डॉ. संजीव सक्सेना यांनी सांगितले की, एकाच वेळी जास्त पाणी पिणे शरीरासाठी चांगले नाही. यामुळे किडनीवर दबाव येतो. बऱ्याचदा लोक सकाळी उठल्याबरोबर २-३ बाटल्या पाणी पितात. यामुळे किडनीला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुम्ही दिवसाची सुरुवात १-२ ग्लास कोमट पाणी पिऊन करावी. यामुळे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल. एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे.
किडनीसाठी किती पाणी प्यावे?
किडनीसाठी पाणी
किडनी निरोगी ठेवण्यासाठी चांगले अन्न आणि पाणी पुरेसे आहे. तुम्ही दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्यावे. यामुळे किडनी शरीरात साचलेले विषारी पदार्थ सहजपणे फिल्टर करू शकते. म्हणून, पाण्याची काळजी घेतली पाहिजे. काही लोक एसी ऑफिसमध्ये काम करताना पाणी पिणे विसरतात किंवा आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात.
लघवीवरून तुम्हाला कळू शकते की तुम्ही कमी पाणी पीत आहात. जर तुम्ही दिवसभरात पुरेशी लघवी करत असाल, म्हणजेच २ लिटरपर्यंत लघवी करत असाल, तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात. जर तुम्ही यापेक्षा कमी लघवी करत असाल, तर समजून घ्या की शरीरात जाणारे पाणी कमी आहे. कमी पाणी पिल्याने शरीरात वाईट पदार्थ जमा होऊ शकतात. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होऊ लागतो.
Kidney Damage Causes: किडनी सडू लागली आहे कसे ओळखावे? रात्रीच्या वेळी शरीरावर दिसतील ‘अशी’ लक्षणे
पाणी पिण्याची योग्य पद्धत
पाणी पिण्याची योग्य पद्धत
पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे दिवसभरात तुम्ही पित असलेल्या ३ लिटर पाण्याचे वाटप करणे. जसे की, सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्या. प्रत्येक जेवणापूर्वी १ ग्लास पाणी प्या. जेवणानंतर अर्धा तास १ ग्लास पाणी प्या. रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्या. जर तुम्ही उष्णतेत शेतात काम करत असाल किंवा कोणत्याही प्रकारे खूप घाम येत असेल, तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.