वेळीच बदला या पाच सवयी
प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळ्या सवयी असतात. मग तुम्ही महिला असाल वा पुरूष. तुमच्या या काही छोट्या सवयी तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? विशेषत: पुरुषांच्या अशा काही सवयी आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरच नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टवरही होतो.
होय, तुम्ही ते बरोबर वाचले! अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे पुरूषांचा प्रायव्हेट पार्ट लहान होऊ शकतो आणि यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे नक्की काय? हे वाचून तुम्ही घाबरून जाऊ नका. धुम्रपान, अत्याधिक मद्यपान, लठ्ठपणा, खराब आहार, सतत बसणे यासारख्या सवयींमुळे दीर्घकाळापर्यंत प्रायव्हेट पार्ट आकुंचन पावणे आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या सवयी सोडून निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया अशाच 5 घाणेरड्या सवयी ज्या तुम्ही लगेच टाळल्या पाहिजेत. (फोटो सौजन्य – iStock)
दारू आणि सिगारेट
दारू आणि सिगारेटमुळे होते नुकसान
धुम्रपान आणि अल्कोहोलचे अतिसेवन हे केवळ तुमच्या फुफ्फुसासाठी आणि यकृतासाठी हानिकारक नाही तर ते पुरुषांच्या खाजगी भागाच्या आकाराला आणि आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. धुम्रपानामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि अवयव आकुंचन होऊ शकते. अल्कोहोलदेखील ही प्रक्रिया खराब करू शकते असे तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितले.
खाण्याच्या चुकीच्या सवयी
पुरूषांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी ठरू शकतात कारणीभूत
जंक फूड आणि तेलकट पदार्थाच्या अतिसेवनामुळे पुरूषांच्या खाजगी भागाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. या प्रकारच्या खाण्याच्या सवयीमुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. परिणामी, प्रायव्हट पार्टचा आकार कमी होऊ शकतो आणि त्याची कार्यक्षमतादेखील कमी होऊ शकते.
आळशीपणा
पुरूषांमधील आळशीपणामुळेही होऊ शकतो त्रास
कोणतीही शारीरिक हालचाल न करता बसणे किंवा कमी सक्रिय राहणे यामुळे पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आकारावर परिणाम होतो असंही डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केलंय. सतत बसण्याने पेल्विक एरियामध्ये रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे अवयव हळूहळू आकुंचन पावू लागतात आणि परिणामी प्रायव्हेट पार्ट लहान होतो.
हेदेखील वाचा – 100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान
जास्त ताण
जास्त ताणामुळे होईल त्रास
मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तणावाचा खोलवर परिणाम होतो. जास्त ताणतणाव झाल्यास, शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे पुरुषांच्या प्रायव्हेट भागाच्या आकारावर परिणाम होतो. दीर्घकाळ तणावामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन निर्माण होते आणि याशिवाय पुरूषांना लैंगिक समस्येलाही सामोरे जावे लागते.
अॅडल्ट व्हिडिओचे व्यसन
अॅडल्ट व्हिडिओचे व्यसन लैंगिक कार्यक्षमतेवर आणि तुम्ही जगत असलेल्या जीवनातील आत्मविश्वासावर परिणाम करते. पुरूषांनी जर अॅडल्ट व्हिडिओचा अतिवापर केला तर अतिवापरामुळे मानसिक ताण वाढतो, ज्यामुळे काम करण्याची क्षमता आणि प्रायव्हेट भागाच्या आकारात बदल होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.