आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! 'हे' आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. पचनक्रिया बिघडल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीरामध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात दुखणे किंवा आतड्यांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादीमुळे शरीराला हानी पोहचते. दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे तिखट तेलकट पदार्थ, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर अननपदार्थ पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पोट बिघडल्यानंतर शारीरिक तणावासोबतच मानसिक तणाव सुद्धा निर्माण होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोट आणि आतड्यांचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या आयुर्वेदिक आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
शरीराची पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित दुपारच्या जेवणात ताकाचे सेवन करावे. नियमित एक ग्लास ताक पय्यल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक किंवा दही खाण्याचा सल्ला दिला जातो. आंबट चवीचे पदार्थ खाल्यामुळे लाळग्रंथी उत्तेजित होतात. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय ताक प्यायल्यामुळे अॅसिडिटी कमी होण्यासोबतच अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
जेवणाच्या ताटात लोणचं असेल तर चार घास जेवण जास्त जाते. आंबट गोड चवीचे लोणचं आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितके वाईट सुद्धा आहे. मोहरीचे तेल, मीठ आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेले घरगुती लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. सूर्याच्या प्रकाशात तयार केलेल्या लोणच्यांमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक आढळून येतात. पण बाजारात विकत मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये रासायनिक प्रिझर्वेटिव्हयुक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते.
विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरासह आरोग्याला अनेक फायदे होतात. गूळ आणि मधामध्ये भिजवलेला आवळा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केस आणि त्वचा कायमच निरोगी राहते. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तयार केलेले जाणारे आंबट गोड कांजी पेय चवीला अतिशय सुंदर लागते. काळे गाजर, बीट आणि चाट मसाल्याचा वापर करून बनवलेले कांजी पेय शरीरात वाढलेली उष्णता कमी करते. यामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स प्रमाण भरपूर असते. या पेयाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी, किंवा ऍसिड रिफ्लक्स, ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे जी तेव्हा उद्भवते जेव्हा पोटात ऍसिडचे प्रमाण वाढते. ऍसिड, जे अन्न पचनासाठी आवश्यक असते, ते प्रमाणात तयार झाल्यास, छातीत जळजळ, आंबट ढेकर, आणि इतर अपचनाची लक्षणे दिसू शकतात.
ऍसिडिटीसाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
ऍसिडिटीची लक्षणे जास्त काळ टिकल्यास.ऍसिडिटीमुळे दैनंदिन जीवनात त्रास होत असल्यास.छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा उलटीमध्ये रक्त येणे यासारखी लक्षणे आढळल्यास.