Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध

बदलती जीवनशैली आणि आहारातील अतिरिक्त मांसाहार यामुळे लहान मुलींमध्ये वयाच्या ८ ते १० व्या वर्षीच पाळी येण्याचे प्रमाण वाढत आहे. या 'प्री-कॉशस प्युबर्टी'मुळे मुलींच्या शारीरिक वाढीवर, मानसिक आरोग्यावर आणि भविष्यातील आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 11, 2026 | 05:05 PM
पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध
Follow Us
Follow Us:
  • अतिरिक्त मांसाहार आणि हार्मोन्समधील बदलांमुळे मुलींमध्ये वयाच्या ८ ते १० व्या वर्षीच अकाली पाळी येण्याचा धोका वाढतो.
  • वेळेआधी पाळी आल्यास मुलींची उंची खुंटणे, पीसीओएसचा धोका आणि भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
  • आहारात मांसाहाराचे प्रमाण सीमित ठेवून पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि नियमित मैदानी खेळांवर भर देणे आवश्यक आहे.

आजकाल अनेक लहान मुलींमध्ये वयाच्या अवघ्या ८ ते १० व्या वर्षीच मासिक पाळी सुरू होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पूर्वी जिथे मुली साधारणपणे १३ ते १५ व्या वर्षी वयात येत असत, तिथे आता खूपच कमी वयात हे शारीरिक बदल दिसू लागले आहेत, असे संशोधानांवरून दिसून येते. वैद्यकीय भाषेत याला ‘प्री-कॉशस प्युबर्टी’ किंवा अकाली प्रौढत्व असे म्हणतात. यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा आणि विशेषतः लहान मुलांमधील मांसाहारी आहार हे एक प्रमुख कारण असल्याचे अनेक जागतिक संशोधनांमधून समोर आले आहे. एक पालक म्हणून नक्कीच तुम्हाला या गोष्टी भेडसावत असतील. याच्या मागचे कारण आणि उपाय आज आपण इथे पाहूयात.

मांसाहार आणि अकाली पाळी: काय सांगते वैज्ञानिक संशोधन?

लहान मुलांमधील मांसाहाराचे प्रमाण आणि मुलींच्या वयात येण्याचा काळ यावर जगभरात विविध अभ्यास झाले आहेत, ज्यामधील खालीलप्रमाणे काही,

१.युनिव्हर्सिटी ऑफ ब्राइटन आणि ब्रिस्टलचा अभ्यास (UK)

युकेमधील ‘चिल्ड्रन ऑफ द ९०ज’ या दीर्घकालीन अभ्यासाअंतर्गत ३,००० हून अधिक मुलींच्या आहाराचे परीक्षण करण्यात आले. यात असे दिसून आले की, ज्या मुली वयाच्या ३ आणि ७ व्या वर्षी आठवड्यातून १२ पेक्षा जास्त वेळा मांसाहार करत होत्या, त्यांच्यामध्ये वयाच्या १२.५ वर्षांपूर्वीच पाळी सुरू होण्याची शक्यता ४९% होती. याउलट, कमी मांसाहार करणाऱ्या मुलींमध्ये हे प्रमाण केवळ ३५% होते.

२.युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे संशोधन (USA):

‘पब्लिक हेल्थ न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, ज्या मुलींच्या आहारात रेड मीट चे प्रमाण जास्त असते, त्यांना कमी मांसाहार करणाऱ्या मुलींच्या तुलनेत सरासरी ५ महिने आधी मासिक पाळी येते.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

मांसाहारामुळे अकाली वयात येण्यामागची मुख्य कारणे

१. अतिजास्त ॲनिमल प्रोटीन आणि IGF-1:

मांसातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्राणिजन्य प्रोटिन्समुळे शरीरात ‘इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर-१’ (IGF-1) या हार्मोनची पातळी वाढते. हे हार्मोन शरीराची वाढ जलद गतीने करते आणि मेंदूला वेळेआधी वयात येण्याचे संकेत देते.

२. पोल्ट्री आणि फार्ममधील कृत्रिम हार्मोन्स:

आजकाल मार्केटमधील फार्म्समध्ये कोंबड्या आणि जनावरांची वाढ वेगाने व्हावी यासाठी अनेकदा स्टिरॉइड्स, ग्रोथ हार्मोन्स आणि प्रतिजैविकांचा वापर केला जातो. असा मांसाहार लहान मुलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या स्त्री-हार्मोनचा समतोल बिघडवतो.

३. शरीरातील अतिरिक्त चरबी आणि इस्ट्रोजेन:

मांसाहारामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे मुलांचे वजन वेगाने वाढते. शरीरातील फॅट सेल्स अँड्रोस्टेनेडिओनचे रूपांतर इस्ट्रोजेनमध्ये करतात. इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्याने स्तनांचा विकास वेगाने होतो आणि मासिक पाळी वेळेआधीच सुरू होते.

मासिक पाळीच्या तीव्र वेदना कायमच्या होतील गायब! दैनंदिन आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, फायब्रॉईडच्या गाठी जातील वितळून

मुलींच्या मासिक पाळीवर आणि आरोग्यावर होणारे परिणाम

अनियमित मासिक पाळी आणि वेदना: कमी वयात गर्भाशय आणि हार्मोन्सची प्रणाली पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे वेळेआधी पाळी आल्यास तीव्र पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव किंवा अनियमित पाळीचा त्रास होतो.

पीसीओएस (PCOS/PCOD) चा धोका: बालपणात हार्मोन्सचा समतोल बिघडल्यामुळे पौगंडावस्थेत पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) होण्याचा धोका वाढतो.

उंची खुंटणे: वयात आल्यानंतर शरीरातील हाडांची वाढ बंद होतात. त्यामुळे लहान वयात पाळी आल्यास मुलींची उंची पूर्ण वाढण्याआधीच थांबते.

मानसिक ताण आणि भीती: अवघ्या ८ ते १० वर्षांच्या बालिकेला पाळीशी संबंधित शारीरिक व मानसिक बदल हाताळणे कठीण जाते. यामुळे चिडचिड, भीती आणि डिप्रेशनची लक्षणे दिसू शकतात.

भविष्यातील गंभीर आजार: संशोधकांच्या मते, ज्या मुलींना अतिशय लहान वयात पाळी येते, त्यांना मोठेपणी स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

प्रमाणबद्ध मांसाहार: मांसाहातून लोह आणि झिंक यांसारखी आवश्यक पोषक तत्वे मिळतात, त्यामुळे मांसाहार पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, आठवड्यातून १-२ वेळापेक्षा जास्त मांसाहार देणे टाळावे.

माशांचा समावेश: संशोधनानुसार, ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मासे खाणाऱ्या मुलींमध्ये पाळी वेळेआधी येण्याचा धोका कमी असतो.

फायबर आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे: आहारात पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचा म्हणजेच प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा समावेश करावा.

शारीरिक हालचाली: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान मुलांना रोज किमान ४५ ते ६० मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायाम करायला लावावा.

Web Title: Early puberty in girls causes meat consumption and health risks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • health
  • LIFESTYLE
  • Periods

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
2

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
3

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.