
दुपारच्या जेवणात 'या' पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची
जेवणाच्या डब्यात नेहमीच काय भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही.भाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण त्याच भाज्या तुम्ही चमचमीत आणि वेगळ्या पद्धतीने बनवल्यास सगळेच लोक आवडीने खातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. शिमला मिरची केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. या भाजीमध्ये विटामिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. घरात भाजी बनवताना त्यात बटाटा किंवा शेंगदाण्याचे कूट टाकले जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते. भरलेली शिमला मिरची तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप