वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरातील सगळीच कामे लेट असतात. दिवसाची सुरुवात उशिराने झाल्यामुळे नाश्त्यात काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, आप्पे इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यास अपचन होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर रव्याचा वापर करून मऊ लुसलुशीत इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही झटपट बनवू शकता. इडली खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. कमीत कमी साहित्य झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. याआधी तुम्ही कायमच तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेली इडली खाल्ली असेल. पण रव्याची इडली सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घ्या वाटीभर रव्याची चविष्ट इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल उत्साहाने! सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी






