उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये करा या हेल्दी पदार्थांचे सेवन
बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. उन्हाळा वाढल्यानंतर शरीर डिहायड्रेट होते. याशिवाय पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर भरपूर पाणी आणि शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळा वाढल्यानंतर शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे उन्हाळ्यात मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन न करता पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हलके आणि हेल्दी पदार्थ खाल्यास ते सहज पचन होतात आणि शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ‘या’ हिरव्या फळाचे करा सेवन, आरोग्याला होतील भरमसाट फायदे
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या पातळी सोबतच पोषक घटकांची सुद्धा कमतरता निर्माण होतात. अशावेळी आहारात हेल्दी आणि सहज पचणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. अनेकदा सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हे सुचत नाही. पण अनेक लोक पचनाच्या समस्येमुळे सकाळचा नाश्ता करणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कायम ऊर्जा टिकून राहील आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात ओट्सचे सेवन करावे. तुम्ही घरच्या घरी मसालेदार किंवा दुधातील ओट्स बनवू शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. ओट्स हा पदार्थ पचनास अतिशय हलका आहे. त्यामुळे उन्हाळा किंवा इतर सर्वच ऋतूंमध्ये तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले फायबर शरीराला ऊर्जा देते. पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात किंवा नाश्त्यात तुम्ही ओट्स खाऊ शकता.
कलिंगड खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खावे. कलिंगड खाल्यामुळे शरीरातील कमी झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. शरीर थंड आणि फ्रेश ठेवण्यासाठी उन्हाळ्यात कलिंगडचे सेवन करावे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
शाकाहारी की मांसाहारी… कोणता आहार आहे सर्वोत्तम? गोंधळून जाऊ नका, एका क्लिकवर उत्तर जाणून घ्या
उन्हाळा वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या मुगाचे सेवन करावे. मोड आलेले मूग आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. याशिवाय यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मूग खाल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.