उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'या' हिरव्या फळाचे करा सेवन
उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला थंड पदार्थाची आवश्यकता असते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि पोटात थंडावा राहतो. वर्षाच्या बाराही महिने बाजारात आवळा हे फळ उपलब्ध असते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चवीला तुरट असलेल्या आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातील. ज्यामुळे आरोग्य सुधारेल आणि पोट स्वच्छ होईल. आवळ्यापासून जॅम, चॉकलेट, कँडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आपल्यातील अनेकांना आवळ्याच्या रसाचे सेवन करायला खूप आवडते. या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर दिसू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि पॉलीफेनॉल नावाचे सक्रिय संयुगेसुद्धा आढळून येते. +विटामिन सी ने समृद्ध असलेला आवळा आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवळ्याचे सेवन कशा पद्धतीने करावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वाढलेले वजन किंवा काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्याचा रस तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेले आवळे, पुदिन्याची पाने, काळ मीठ आणि आवश्यकतेनुसार साखर घालून एक ग्लास पाणी टाकून रस तयार करा. तयार केलेले सरबत गाळून तुम्ही सेवन करू शकता. यात आलेले गुणधर्म त्वचेची गुणधर्म सुधारण्यासाठी मदत करते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारून शरीर डिटॉक्स होते.
अनेकांना आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्याचा वापर करून चविष्ट चटणी बनवू शकता. चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथममी आवळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यानंतर कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटा. त्यानंतर केलेलूया चटणीमध्ये आवश्यकता वाटल्यास लिंबाचा रस मिक्स करा. या चटणीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
आवळा पावडर खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म शरीर स्वच्छ करतात.आवळा पावडर तुम्ही पाण्यात मिक्स करून उपाशी पोटी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. वाटीमध्ये दही घेऊन त्यात आवळा पावडर आणि मध मिक्स करून खाल्यास शरीर थंड राहील.