(फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खरंतर, शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे आहार घेतात. काही लोकांना शाकाहारी जेवण आवडते तर काहींना मांसाहारी जेवण आवडते. आपण ज्या प्रकाराचा आहार घेतो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रत्येक अन्नात काही पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. अशात त्यांची योग्य निवड करणे गरजेचे आहे. शाकाहारी आणि मांसाहारी यातील सर्वात फायदेशीर कोणते याबाबत अनेकजण गोंधळलेले असतात. आज आम्ही या लेखात तुमचा हाच गोंधळ दूर करणार आहोत.
शाकाहारी आहाराचे फायदे
शाकाहारी आहारात फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. हिरव्या भाज्या, फळे, डाळी, धान्ये, काजू आणि बिया या सर्वांचा शाकाहारी आहारात समावेश होत असतो. यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, शिवाय हृदयाचे आरोग्य, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित राहण्यासही मदत होते. जे लोक शाकाहारी आहार घेतात त्यांना लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.
मांसाहारी आहाराचे फायदे
मांसाहारी आहारात प्रथिने, व्हिटॅमिन बी१२, लोह, जस्त आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडसारखे पोषक घटक आढळतात. जर तुम्ही मांसाहारी खाल्ले तर ते स्नायू तयार करण्यास, सहनशक्ती वाढविण्यास आणि अशक्तपणासारख्या समस्या टाळण्यास मदत करते. ज्या लोकांना हाय प्रोटीन डाएटची आवश्यकता असते, जसे की खेळाडू किंवा बॉडीबिल्डर्स, त्यांच्यासाठी मांसाहार हा एक उत्तम पर्याय आहे.
समस्या
शाकाहारी आहारात जरी व्हिटॅमिन बी १२ आणि प्रथिनांची कमतरता असली, तरी मांसाहारी जेवणात हे जास्त प्रमाणात आढळून येते. यामुळे सक्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल वाढू शकतो. परिणामी यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.
संतुलन ठेवणे महत्त्वाचे
कोणताही आहार संतुलित असल्याशिवाय तो निरोगी मानला जाऊ शकत नाही. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिने आणि व्हिटॅमिन बी१२ ची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, सोया आणि डाळींचा आहारात समावेश करावा लागेल. याचप्रमाणे, जर तुम्हाला मांसाहारी आहार घ्यायचा असेल तर फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी तुमच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा लागेल. प्रत्येक अन्नात विशिष्ट पोषक घटक समाविष्ट असतात अशात सर्व गोष्टींचे संतुलन राखून त्यांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरेल.
दोन्हींमध्ये फायदेशीर कोणता?
मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवण जास्त फायदेशीर मानले जाते. यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर फायदेशीर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. मात्र, कोणत्याही प्रकारचा आहार घेण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.