Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या भाज्या खेचून काढतात रक्तातील घाण, आजच आहारात करा समावेश

बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारातही अनेक बदल घडून आले आहेत. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही भाज्या फार उपयुक्त ठरत असतात. मुख्य म्हणजे या भाज्या फार कमी किमतीत बाजारात उपलब्ध असतात. या भाज्यांचे सेवन करून तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. त्यामुळे लगेच या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 11:51 AM
20 रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या भाज्या खेचून काढतात रक्तातील घाण, आजच आहारात करा समावेश

20 रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या भाज्या खेचून काढतात रक्तातील घाण, आजच आहारात करा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या काळानुसार, आपल्या आहारातही अनेक बदल झाले. इतर गोष्टींप्रमाणेच वेळोवेळी आणि योग्य रीतीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अनेकांच्या आहारात भाज्यांचे प्रमाण फार कमी असते, परिणामी लोक कमी वयातच अनेक आजरांनी ग्रासलेले असतात. भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करत असतात. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी तर आपल्या आहारात भाज्यांचे नियमित सेवन करायला हवे. यातील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर घटक असतात, जे कोलेस्टेरॉलच्या पातळीला संतुलित ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

तसेच भाज्या आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) बाहेर काढण्यासही आपली मदत करत असतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही स्वस्त भाज्यांविषयी सांगणार आहोत ज्यांचे नियमित सेवन तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. अनेक पोषकतत्वांनी युक्त या भाज्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास आणि रक्तातील घाण बाहेर काढण्यास मदत करतात.

या भाज्यांचा करा आहारात समावेश

हेदेखील वाचा – केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश

गाजर

गाजर ही हेल्दी भाजी आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक हेल्दी पदार्थांमध्ये गाजराचा वापर केला जातो. गाजरात पेक्टिन नावाचा फायबर असतो, जो शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यात मदत करतो. याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टोल तर नियंत्रित राहतेच शिवाय हृदयदेखील निरोगी राहण्यास मदत मिळते. तुम्ही याचे कच्चेदेखील सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या सलाडमध्ये याचा समावेश करू शकता. गाजरामध्ये व्हिटॅमिन A देखील मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

काकडी

काकडीचा अनेक प्रकारे फायदा होत असतो. फक्त शरीराच्या निरोगी आरोग्यासाठीच नव्हे तर चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठीही काकडी फार मदतनीस ठरते. काकडी फायबर आणि पाण्याने भरपूर असते, जी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. तुम्ही काकडी कच्ची सलाडमध्ये टाकून खाऊ शकता. काकडीमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्यास याची मदत होते. काकडीच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा

टोमॅटो

अनेक भाज्यांमध्ये वापरला जाणारा टोमॅटोदेखील तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतो. टोमॅटो भाजीत टाकून किंवा कच्चा अशा दोन्ही प्रकारे खाता येतो. तुम्ही टोमॅटोची चटणी, सूप असे अनेक चविष्ट पदार्थ बनवून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.

Web Title: Eat these raw vegetables in diet for reduce bad ldl cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ
1

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल
3

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
4

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.