संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी मधात मिक्स करून खा 'हा' पदार्थ
संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची जास्त काळजी घेण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. कारण पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरू लागतात. दूषित पाणी, बाहेरील अन्नपदार्थांचे अतिसेवन किंवा बदलत्या वातावरणामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र हेच आजार काही दिवसानंतर आणखीनच गंभीर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला झाल्यानंतर अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे
प्रत्येक स्वयंपाक घरात मसाले उपलब्ध असतात. त्यात आवर्जून जेवणात वापरला जाणारा मसाला म्हणजे काळीमिरी. चवीला तिखट असलेली काळीमिरी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी आवश्यक ठरतात. आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी खाल्यास शरीरातील अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत होईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार झाल्यानंतर संपूर्ण शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कायम निरोगी राहण्यासाठी मधात कोणते पदार्थ मिक्स करून खावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
काळीमिरी मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासाठी वाटीमध्ये मध घेऊन त्यात चिमूटभर काळीमिरी पावडर टाकून मिक्स करा. तयार केलेले चाटण खाल्ल्यानंतर वरून कोमट पाण्याचे सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होईल. काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचा गुणकारी घटक आढळून येतो, ज्यामुळे श्वसनमार्ग उघडतो. सर्दी, खोकला झाल्यानंतर काळीमिरी मधाचे सेवन करावे. यामुळे घसा खवखवणे, श्लेष्मा आणि खोकल्यापासून लगेच आराम मिळतो.
काळीमीरीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. यासोबतच पचनसंबंधित कोणताही त्रास होत नाही. मध आतड्यांमधील घाण स्वच्छ करून आतड्यांची हालचाल सुलभ करतो. नियमित मध आणि काळीमीरीचे चाटण खाल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्ताचा त्रास होणार नाही.याशिवाय भूकेवर नियंत्रण राहील.
पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी काळीमिरी मधाचे मिश्रण खावे आणि वरून कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होईल आणि शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील. मधामध्ये असलेला नैसर्गिक गोडवा शरीराला ऊर्जा देतो. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मधाचे सेवन करावे.