धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका 'या' चुका
सुंदर दिसण्यासाठी महिला केसांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. केस चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा शॅम्पू लावले जातात. शॅम्पूचा वापर करून केस धुतल्यानंतर अतिशय मऊ आणि चमकदार दिसू लागतात. पण बऱ्याचदा केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केस आतमधून ओलेच राहतात. केस ओले असताना अतिशय सुंदर दिसतात. पण अशावेळी केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. केस तसेच ओले राहिल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक गळणे, केस तुटणे किंवा इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात. तर अनेक महिला अंघोळ केल्यानंतर महिला जोरात केस विंचरणे, केस घट्ट बांधून ठेवणे, केसांची वेणी घालणे इत्यादी अनेक गोष्टी करतात. यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. खराब झालेले केस सुधारण्यासाठी कोणत्याही चुकीच्या शँम्पूचा वापर करू नये.(फोटो सौजन्य – istock)
ओले केस अतिशय अतिशय नाजूक असतात. केस ओले झाल्यानंतर कटिकल’ उघडलेला जातात. यामुळे केस अधिक संवेदनशील आणि कमजोर होण्याची शक्यता असते. केस कमजोर आणि निस्तेज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओल्या केसांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नाजूक केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाहीतर केस अतिशय निस्तेज आणि कोरडे झाल्यासारखे वाटू लागतात.
केस स्वच्छ धुवाण्याआधी केस व्यवस्थित विंचरणे आवश्यक आहे. कारण गुंता झालेले केस पाण्याने धुतल्यानंतर अजूनही गुंतण्याची शक्यता असते. त्यामुळे केस धुवण्याआधी व्यवस्थित विंचरून घ्या. केस धुवून झाल्यानंतर हेअर सिरमचा वापर करावा. हेअर सिरम केसांची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय केस धुवण्याआधी गुंता सोडवल्यास केस जास्त ओढले जाणार नाहीत. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल.
ओल्या केसांवर जबरदस्तीने कंगवा फिरवू नये. यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते. केस अतिशय नाजूक असतात. त्यामुळे ओल्या केसांवर कंगवा फिरवल्यास केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे धुतल्यानंतर लीव्ह-इन कंडिशनरचा वापर करावा. लीव्ह-इन कंडिशनर लावल्यामुळे केसांमध्ये वाढलेला गुंता कमी होण्यास मदत होते. याशिवाय केस विंचरण्यासाठी वाइड-टूथ कंगवा किंवा डिटॅंगलिंग ब्रशचा वापर करावा. यामुळे तुमचे केस तुटणार नाहीत.
काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब
केस पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कधीही केसांची वेणी किंवा आंबाडा घालू नये. असे केल्यामुळे केसांची मूळ ताणली जातात. केसांच्या मुळांवर ताण आल्यामुळे केस गळणे किंवा केस तुटण्याची समस्या उद्भवू लागते. केस घट्ट बांधल्यानंतर केसांमध्ये गाठी तयार होतात. या गाठी मोकळ्या करताना केस तुटून जातात. त्यामुळे केस धुतल्यानंतर कधीही घट्ट बांधू नये.