या' लोकांनी चुकूनही करू नका शेवग्याच्या पावडरचे सेवन!
शेवग्याच्या शेंगा खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कारण यामध्ये असलेले घटक हाडांमधील वेदना आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. तसेच शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न, विटामिन सी, विटामिन बी6, बी2, व्हिटामिन ए, मॅग्नेशिअम इत्यादी अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली शेवग्याची शेंगा शरीरासाठी गुणकारी आहे. शेवग्याच्या शेंगा, पानांची आणि फुलांची भाजी करून खाल्ली जाते. मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग वरदान आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा या भाजीला विशेष महत्व आहे. या भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. शरीरात निर्माण झालेली विटामिन आणि मिनिरल्सची कमतरताभरून काढण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी खावी.(फोटो सौजन्य – istock)
नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल धक्का मारून बाहेर काढेल उकडलेली ‘ही’ भाजी, कमी होईल हार्ट अटॅकचा धोका
शरीरात वाढलेला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर पाण्यात मिक्स करून प्यायली जाते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे सेवन केले जाते. मात्र शेवग्याच्या शेंगांची पावडर काहींच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची पावडर कोणी खाऊ नये? यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अनेक लोक सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी जाहिराती पाहून शेवग्याचे सप्लीमेंट, कॅप्सूल किंवा पावडरचे सेवन करतात. मात्र हे पदार्थ खाणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे शरीराला गंभीर इजा होऊ शकते. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे ज्याप्रमाणे शरीराला फायदे होतात, तितकेच शरीराला तोटेसुद्धा होतात. त्यामुळे काहींच्या आरोग्यासाठी शेगव्याची पावडर अतिशय घातक ठरू शकते. शेवग्याच्या पावडरचे सेवन केल्यामुळे शरीरातील वात आणि कफ दोष कमी होतो पान पित्त दोष वाढण्याची शक्यता असते. शेवग्या आरोग्यासाठी अतिशय उष्ण आणि गरम आहेत.
गरोदरपणात आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात. त्यामुळे आहारात अति उष्ण किंवा गरम पदार्थ खाऊ नये, असा सल्ला सुद्धा दिला जातो. पण महिला जाहिराती किंवा इतरांच्या सल्ल्याने काहीवेळा शेवग्याचे सप्लीमेंट्स पितात. हे सप्लीमेंट्स पोटातील बाळासाठी आणि शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे महिलांमध्ये गर्भपाताचा धोका वाढतो.तसेच यूटेराइन कॉन्ट्रक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. मिसकॅरेज आणि अबॉर्शन धोका वाढू लागतो. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या किंवा फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करू नये.
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी गुणकारी असतात. पण जास्त ऍसिडिटी, ब्लीडिंग पाइल्स, मासिक पाळी जास्त रक्तस्त्राव, गॅस्ट्रायटिसचे रूग्ण, गॅस्ट्रिक अल्सरचे रूग्ण इत्यादींनी आहारात शेवग्याच्या शेंगांचे किंवा पावडरचे सेवन करू नये.