पूर्वीच्या काळापासून भारतासह इतर अनेक देशांमध्ये अन्न हाताने खाल्ले जात आहे. हाताने जेवल्यानंतर आरोग्याला देखील फायदे होतात. पचनक्रिया सुधारून शरीर निरोगी राहते. हाताने जेवण्याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. पण बदलत्या काळानुसार आणि जीवनशैलीमुळे अनेक लोक बाहेर गेल्यानंतर किंवा घरात चमच्याने जेवतात. पण त्याचा फारसा फायदा शरीराला होत नाही. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळेस जेवण हाताने जेवले पाहिजे.
हाताने अन्न जेवल्यामुळे आपण निर्सगासोबत जोडून राहतो.हाताने जेवल्याने आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या दूर होतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी हाताने जेवण्याचे फायदे सांगितले आहे. हाताने अन्नपदार्थ जेवल्यानंतर शरीराला ते व्यवस्थित पचन होते. हाताने जेवण्याचे फायदे काय आहेत याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला आहे. चला तर जाणून घेऊया हाताने जेवल्यानंतर शरीराला काय फायदे होतात..
हाताने अन्नपदार्थ जेवल्याने शरीराला होणारे फायदे:






