निफाड येथे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भटक्या कुत्र्यांमुळे ; कुत्रे सोडून उभाटाचे निषेध आंदोलन. निफाड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप विक्रम रंधवे यांनी केला आहे. गणेशोत्सव सुरू असताना नागरिकांना मंडळांपर्यंत जाणेही अवघड झाले असून, अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून केवळ चालढकल केली.