कराड, सातारा बाल निरीक्षण गृहातील मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. निशांत शिलवंत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी बालगृहातील मुलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणात एका निशांत शिलवंत याला मारहाण झाल्याची माहिती आहे.या निशांतवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते.मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.