शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गुणकारी पेय
सण समारंभाच्या दिवसांमध्ये घरात येणाऱ्या पाहुण्यांपासून सगळेच जण मिठाईचे पदार्थ आणि फराळातील पदार्थ घेऊन घरी येतात. घरी सतत गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये कवित्व कमी प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करावे. गोड पदार्थ खात आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन आणि शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पेयांचे नियमित सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:केस गळतीवर प्रभावी ठरतील ‘ही’ गुणकारी फुले, झपाट्याने होईल केसांची वाढ
लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लिंबू पाण्यात असलेले विटामिन सी त्वचेसोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून प्या. हा उपाय नियमित केल्यास पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर स्लिम दिसेल. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी टोपात पाणी गरम त्यात आल्याचे तुकडे बारीक करून टाकावे. त्यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आल्याचे पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्या.हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होईल.
सकाळी उठल्यानंतर नियमित दुधाचा चहा पिण्यावेजी ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी मध्ये असलेले गुणधर्म वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. शिवाय ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट आढळून येतात. त्यामुळे दिवसभरातून एकदा ग्रीन टी चे सेवन करावे.हे
देखील वाचा: कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्या आहेत? मग नियमित करा ‘या’ पेयाचा आहारात समावेश
पॅकिंग किंवा प्रोसेस केलेले अन्नपदार्थ खाण्यापेक्षा ताजा फळांचा रस प्यावा. फळांच्या रसात असलेल्या घटकांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच फळांचा रस प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. शिवाय शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी ३० मिनिटं चालणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी नियमित प्राणायाम आणि योगाचे प्रकार करावे.