अर्जुनाच्या सालीचा चहा:
जगभरात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहिल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हृदयाचे कार्य बिघडते. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळावे. अतिप्रमाणात तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यास शरीरात कोलेस्ट्रोलशिवाय रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे आरोग्य आणखीन बिघडू लागते. (फोटो सौजन्य-istock)
हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य त्या सवयी फॉलो करून आरोग्याची काळजी घ्यावी. आयुर्वेदामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठीच अनेक लाभदायक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय फॉलो केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी आयुर्वेदातील गुणकारी उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: दिवाळीत तेलकट पदार्थ खाऊन छातीमध्ये जळजळ होते? अॅसिडिटी कमी करण्यासाठी प्या ‘हे’ गुणकारी पेय
सतत धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांसोबतच हृदयाचे आरोग्य सुद्धा बिघडून जाते. धूम्रपान केल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अल्कोहोलमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नेहमीच वाढलेला असतो. त्यामुळे धूम्रपान करणे टाळावे. सतत धूम्रपान करू नये.
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित योगासने, व्यायाम करावा. योगासने, प्राणायाम केल्यामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित पोहणे, धावणे, चालणे, जॉग करणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग इत्यादी गोष्टी केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. नियमित व्यायाम केल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.
हे देखील वाचा: हळद आणि मध खाण्याचे काय आहेत फायदे?
कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी अर्जुनाच्या सालीचा चहा प्यावा. या चहात असलेले गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. या चहाचे सेवन तुम्ही कधीही करू शकता. अर्जुनाच्या सालीचा चहा बनवण्यासाठी १ किंवा २ कप पाण्यात अर्जुनाची साल टाकून व्यवस्थित उकळवून घ्यावी.त्यानंतर चहा गाळून चहाचे सेवन करावे. आयुर्वेदामध्ये अर्जुनाच्या सालीला विशेष महत्व आहे. या सालीचा चहा तुम्ही रिकाम्या पोटीसुद्धा पिऊ शकता. यामुळे आरोग्याला अधिक फायदे होतील.