डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रभावी उपाय
सोशल मीडियाच्या युगात लॅपटॉप,मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर वापरला केला जाते आहे. सतत फोन किंवा लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या वयातील लोकांकडे सुद्धा अँड्रॉइड मोबाईल पाहायला मिळत आहेत. तासनतास मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांवर ताण आल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. सतत मोबाईल आणि लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळे दुखणे, डोकं दुखणे, मान दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक डोळ्यांवर चष्मा लावतात. पण सतत लॅपटॉप पाहून वाढलेला डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नक्की फॉलो करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
आठ नऊ तास सतत लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसून काम करत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी 5 ते 10 मिनिटं डोळ्यांची उघडझाप करून व्यायाम करू शकता. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन आराम मिळेल.
हे देखील वाचा: युरिक अॅसिडमध्ये खाऊ नका हा सफेद पदार्थ, सांधेदुखीने व्हाल हैराण
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रभावी उपाय
सतत काम न करता काहीवेळ ब्रेक घेणे सुद्धा गरजेचे आहे. ब्रेक घेत काम केल्यामुळे कंटाळा किंवा आळस येत नाही. संपूर्ण वेळ कामावर लक्ष केंद्रित केल्यानंतर डोळे दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी तुम्ही मध्ये मध्ये 20 मिनिटांचा ब्रेक घेतल्यास डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच तुम्ही तुमच्या ऑफिस टेबलावर एखादे सुंदर झाड ठेवू शकता.
मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर सुद्धा डोळे दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी तुम्ही हाताने डोळ्यांवर मसाज करू शकता. डोळ्यांवर मसाज करताना नेहमी हलक्या हाताने मसाज करावा. जेणेकरून डोळ्यांच्या अतिभागाला कोणतीही इजा पोहचणार नाही. डोळ्यांसोबतच कपाळावर सुद्धा तुम्ही मसाज करू शकता.
हे देखील वाचा: मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ कला ठरतील प्रभावी, मेंदूत होईल सुधारणा
काम करताना डोळे अधून मधून चारही बाजूने फिरवून घ्या. डोळे फिरवताना डोळे आधी बंद करून घ्या. त्यानंतर डोळे फिरवा. हा व्यायाम नियमित केल्यास डोळ्यांचा तणाव कमी होईल. हा उपाय नियमित 10 वेळा फॉलो करा.