युरिक अॅसिड असल्यास काय खाऊ नये
युरिक अॅसिड ही शरीरातील एक प्रकारची घाण आहे. अन्नामध्ये असलेल्या प्युरीन नावाच्या प्रथिनाच्या विघटनाने युरिक अॅसिड तयार होते. हे युरिक अॅसिड रक्ताद्वारे मूत्रपिंडात पोहोचते आणि लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. परंतु जेव्हा युरिक अॅसिडचे प्रमाण शरीरात जास्त होते तेव्हा त्याचे क्रिस्टल्समध्ये रूपांतर होते आणि सांध्यातील संधिवातसारख्या समस्या निर्माण होतात.
महिलांच्या शरीरात 1.5 ते 6.0 mg प्रति डेसीलिटर (mg/dL) युरिक अॅसिड आणि पुरुषांच्या शरीरात 2.5 ते 7.0 mg/dL इतके प्रमाण असणे हे अत्यंत सामान्य आहे. मात्र शरीरातील युरिक अॅसिडचे हे प्रमाण ओलांडले तर लगेच आहारात बदल करणे आवश्यक आहे असा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टर माधव भागवत यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला युरिक अॅसिडचा अधिक त्रास असेल तर दही खाणे टाळायला हवे. आता नक्की कसे ते जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
युरिक अॅसिड लक्षणे
युरिक अॅसिडची लक्षणे काय आहेत
काय सांगते आयुर्वेद
दही खाणे ठरू शकते त्रासदायक
आयुर्वेदात युरिक अॅसिड असल्यास दही खाण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्तविक, दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे युरिक अॅसिड शरीरात वाढवण्यास कारणीभूत ठरते. परंतु अनेक आरोग्यतज्ज्ञ दुग्धजन्य पदार्थांना युरिक अॅसिड कमी करण्यास सांगतात. विशेषतः आयुर्वेदिक डॉक्टर दही न खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे युरिक अॅसिडचा त्रास असेल तर दही न खाणे योग्य ठरते असे आयुर्वेदिक डॉक्टरांचे मत आहे.
हेदेखील वाचा – युरिक अॅसिड त्वरीत काढेल शरीराबाहेर, 5 आयुर्वेदिक उपाय कराच
युरिक अॅसिड या पदार्थांनीही वाढते
युरिक अॅसिड वाढवणारे पदार्थ
तुम्हाला जर युरिक अॅसिडचा त्रास असेल तर त्यामध्ये लाल मांस, अल्कोहोल, लोणी, मलई, आइस्क्रीम, कोल्डड्रिंक्स, अरवी, पालक, चणे, राजमा, तांदूळ, गूळ, मशरूम यांसारख्या पदार्थांचे सेवन हे अधिक भर घालू शकते. त्यामुळे अशा पदार्थांचा वापर आपल्या डाएटमध्ये कमी करा. त्यापेक्षा फ्लॉवरसारख्या भाज्यांचा समावेश करून घ्या.
हेदेखील वाचा – शरीरात वाढलंय युरिक अॅसिड, ही हिरवी चटणी रोज खाल तर होईल नष्ट
युरिक अॅसिडवरील त्वरीत उपाय
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.