Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

एंडोमेट्रिओसिस हा दीर्घकालीन स्त्रीरोग असून गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे ऊतक गर्भाशयाबाहेर वाढू लागते. हे ऊतक अंडाशय, फलोपियन ट्यूब आणि पेल्विक भागात आढळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 11:00 AM
एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

मुंबई : जागतिक पातळीवरील आकडेवारीनुसार प्रजनन वयोगटातील दर १० पैकी १ महिलेला एंडोमेट्रिओसिसची समस्या उद्भवते. सुमारे १९० दशलक्ष महिलांना हा आजार असूनही त्याच्या निदानास विलंब होतो किंवा चुकीचे निदान होते. एंडोमेट्रिओसिस जनजागृती महिन्याच्या निमित्ताने या आजाराबाबत महिलावर्गात जागरूकता वाढवणे आणि नव्या उपचार पद्धतींबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संस्थपकानी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

महिला आपल्या दैनंदिन आयुष्यात कुटुंब, मुलं, घर तसेच ॲाफीसचे काम आणि जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र महिलांच्या शरीरात होणारे जैविक बदल लक्षात घेता त्यांना विशेष काळजी आणि योग्य उपचारांची गरज असते. निरोगी महिला ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर कुटुंब आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची असते.

एंडोमेट्रिओसिस हा दीर्घकालीन स्त्रीरोग असून गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे ऊतक गर्भाशयाबाहेर वाढू लागते. हे ऊतक अंडाशय, फलोपियन ट्यूब आणि पेल्विक भागात आढळते. मासिक पाळीच्या वेळी हे ऊतक हार्मोनल बदलांना प्रतिसाद देते, परंतु ते बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे तीव्र सूज येणे, वेदना होणे आणि ऊतींना जखम( scar tissue) तयार होते.

या आजाराची लक्षणे म्हणजे मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना, पोटाच्या खालच्या भागात सतत वेदना, वाढता रक्तस्राव, पचनाच्या तक्रारी, थकवा आणि वंध्यत्वाची समस्या जाणवते. ही लक्षणे साध्या पाळीच्या त्रासासारखी वाटत असल्याने अनेक महिलांमध्ये निदानास विलंब होतो.परंपरागत उपचारांमध्ये वेदना कमी करणारी औषधं, हार्मोन थेरपी किंवा शस्त्रक्रिया करून वाढलेले ऊतक काढून टाकणे यांचा समावेश होतो. मात्र आधुनिक संशोधनात आजाराच्या मूळ कारणांवर, जसे की सूज, प्रतिकारशक्तीतील असंतुलन आणि पेशींचे कार्य बिघडणे, यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि सेल-आधारित थेरपी या आधुनिक उपचार पद्धती शरीराच्या नैसर्गिकरित्या बरे होण्याच्या प्रक्रियेस मदत करतात. या पद्धतीमुळे पेशींची दुरुस्ती, सूज कमी होणे आणि प्रजनन संस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पेल्विक भागातील इजा, दीर्घकालीन सूज, हार्मोनल असंतुलन किंवा वंध्यत्वाची समस्या असलेल्या महिलांना अशा उपचारांचा फायदा होऊ शकतो.

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

तज्ज्ञांच्या मते, हार्मोनल असंतुलनामुळे त्वचा, केस आणि एकूणच ऊर्जा पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे सध्याच्या काळात रिजनरेटिव्ह आणि एस्थेटिक थेरपीद्वारे त्वचेची गुणवत्ता, केसांची वाढ आणि कोलेजन निर्मिती सुधारण्यावरही भर दिला जातो.महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिल्यास कुटुंब, समाज आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल.

Web Title: Effective treatment of endometriosis with cell based method know the detailed information given by the experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Doctor advice
  • health issue
  • women health

संबंधित बातम्या

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
1

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
2

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
4

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.