Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Liver Detox: लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच कॉफी, डाळिंबाच्या दाण्यांचा रस, आल्याचा रस इत्यादी पेयांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. या पेयांच्या सेवनामुळे लिव्हरवर जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2026 | 08:00 AM
लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचा समावेश

लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचा समावेश

Follow Us
Follow Us:

लिव्हर डिटॉक्स का करावे?
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी पेय?
कॉफी पिण्याचे गुणकारी फायदे?

Liver Detox: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवांकडे व्यवस्थित लक्ष देणे फार आवश्यक आहे. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे इत्यादी पन्नासपेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो. आहारात सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते.(फोटो सौजन्य – istock)

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर

लिव्हर स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याची अजिबात आवश्यकता नसते. आहारातील फायबर, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी महत्वाचे ठरतात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करावा. यामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच लिव्हरच्या कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात या पेयांचा समावेश करावा. उपाशी पोटी गुणकारी पेयांचे सेवन केल्यास महिनाभरात शरीरात अनेक बदल दिसून येतील.

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात ‘या’ पेयांचा समावेश:

चिया सीड्स आणि लिंबाच्या पाण्याचे मिश्रण सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये थोडस पाणी घेऊन त्यात चिया सीड्स भिजत ठेवावेत. रात्रभर चिया सीड्स भिजल्यानंतर सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि भिजवलेले चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढेल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल.

ब्लूबेरी स्मूदी:

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय यामध्ये असलेले अँथोसायनिन्स शरीरातील पेशींचे रक्षण करते. आंबवलेल्या दुधापासून तयार केलेले ड्रिंक प्यायल्यास प्रोटीन आणि चांगले बॅक्टेरिया शरीराला मिळतील. तसेच उपाशी पोटी आल्याचा रस किंवाडाळिंबाचा रस प्यावा. आल्याच्या रसात असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यावा.

Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा

कॉफी आणि कोको:

लिव्हरच्या आरोग्यासाठी कॉफी खूप जास्त प्रभावी मानली जाते. यामध्ये असलेले कॅफिन लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. लिव्हरमधील फायब्रोसिस, सिरोसिस आणि लिव्हरच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कॉफी गुणकारी आहे. कॉफीमध्ये कोको मिक्स करून प्यायल्यास फ्लॅव्हेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स शरीराला मिळतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याची समस्या म्हणजे काय?

    Ans: साखर न घातलेला चहा किंवा कॉफी, साधे पाणी आणि साखर न घातलेली पेये संतुलित आहाराचा भाग ठरू शकतात.

  • Que: ग्रीन टी प्यायल्याने फॅटी लिव्हर कमी होतो का?

    Ans: ग्रीन टीमधील काही घटकांवर लिव्हरच्या आरोग्याच्या दृष्टीने संशोधन झाले आहे. मात्र, ग्रीन टी हा फॅटी लिव्हरवरील उपचार नाही. ग्रीन टीचे अर्क किंवा जास्त प्रमाणातील सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

  • Que: बीट किंवा आवळ्याचा रस लिव्हरसाठी उपयुक्त आहे का?

    Ans: बीट आणि आवळ्यामध्ये विविध पोषक घटक असतात. त्यांचा संतुलित आहारात समावेश करता येतो; मात्र हे रस लिव्हरमधील चरबी नष्ट करतात, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

Web Title: Eliminate excess fat accumulated in your liver for good include these drinks in your diet for a liver detox sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Healthy Drinks
  • liver care

संबंधित बातम्या

दूध पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे! दही, ताक, पनीर आणि तुपाचे फायदेही जाणून घ्या
1

दूध पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे! दही, ताक, पनीर आणि तुपाचे फायदेही जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.