दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले 'हे' उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय करावे?
नॅचरली ग्लोईंग स्किनसाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितलेले उपाय?
Beauty Tips: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळी म्हंटल की सगळीकडे मोठा उत्साह आणि आनंद असतो. आनंदाच्या दिवसांमध्ये चेहरा कायमच फ्रेश आणि तेजस्वी दिसावा, यासाठी अनेक वेगवेगळे उपाय सुद्धा केले जातात. केवळ चेहराच नाहीतर वजन, केस आणि संपूर्ण शरीर फ्रेश दिसावे, यासाठी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट, स्किन केअरमध्ये बदल केला जातो. पण वारंवार महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने तयार होणे शरीरासाठी फायदेशीर ठरेल. याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले हे उपाय फॉलो केल्यास दिवाळी आधी चेहऱ्यावर चमकदार ग्लो दिसेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीचे जेवण जेवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वाटीभर भाताची पेज प्यावी. भाताच्या पेजमध्ये काळीमिरी पावडर किंवा तूप मिक्स करून खाल्ल्यास चव आणखीनच मस्त लागते. भाताची पेज खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते आणि शरीर फ्रेश राहते. पचनाच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी भाताची पेज खाणे फायदेशीर ठरेल. पचनक्रिया चांगली झाल्यास आपोआपच शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
आवळ्याचे सरबत, आवळा सुपारी, आवळ्याचे लोणचं, आवळ्याचा मुरांबा इत्यादी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. आवळा खाल्ल्यामुळे केसांची वाढ होत नाहीतर संपूर्ण शरीराला त्याचे भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्यामुळे केसांची झपाट्याने वाढ होते आणि आरोग्य चांगले राहते. आवळ्यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, अशक्तपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे नियमित शारीरिक हालचाल करणे. व्यायाम, योगासने, पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्यास इनर थाईजचा भाग ॲक्टीव्ह होतो आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते. कंबर, पाठ आणि मानेचे स्नायू मोकळे होण्यासाठी पायऱ्यांवर व्यायाम करणे आवश्यक आहे. याशिवाय रोज सुर्यनमस्कार किंवा इतर योगासने केल्यास शरीरात बदल दिसून येतील.
Ans: ऋजुता दिवेकर यांच्या आहारविषयक मार्गदर्शनात संतुलित आहार, स्थानिक आणि हंगामी पदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांना महत्त्व दिले जाते.
Ans: संतुलित आहार घ्यावा, जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात, रोज चालणे किंवा इतर शारीरिक हालचाली कराव्यात आणि पुरेशी झोप घ्यावी.
Ans: संतुलित आहार, पुरेसे पाणी, चांगली झोप आणि नियमित व्यायाम यामुळे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, केवळ वजन कमी केल्याने चेहरा फ्रेश दिसेलच असे नाही.






