
Elon Musk आणि Messy ची आवडती मुद्रा आहे उत्तरबोधी, Uttarbodhi Mudra आसन करण्याचे फायदे घ्या जाणून
उत्तरबोधी मुद्रा आसन करण्याचे फायदे?
एलॉन मस्क कायमच उत्तरबोधी आसनात का दिसतात?
नियमित योगासने केल्यास शरीराला होणारे फायदे?
जगभरातील श्रीमंतांच्या यादीमध्ये एलॉन मस्क यांचे नाव आघाडीवर आहे. एलॉन मस्क यांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आपले नाव कायम टिकवून ठेवले आहे. त्यांनी अंतराळ क्षेत्रासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची भेट असो किंवा कोणत्याही मीटिंगमध्ये एलॉन मस्क कायमच उत्तरबोधी मुद्रा आसनात दिसून येतात. यामागे अनेक महत्वपूर्ण कारणे आहेत. मुलाखतीमध्ये त्यांच्या हातांकडे पाहिल्यास ते विशिष्ट मुद्रेवर केंद्रित असतात. या मुद्रेला उत्तरबोधी मुद्रा आसन असे म्हणतात. जगभरातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती मुलाखती दरम्यान कायमच तुम्हाला उत्तरबोधी मुद्रा आसनात दिसेल. हे आसन नियमित केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला उत्तरबोधी मुद्रा आसन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आलेले घरगुती उपाय, त्वचा राहील तरुण
योगसाधनेसह ध्यानधारणेमध्ये या रचनेला शक्ती हस्तमुद्रा असे म्हंटले जाते. भारतीय परंपरेमध्ये या मुद्रेला विशेष महत्व आहे. धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी उत्तरबोधी मुद्रा आसन करावे. अंतर्मनाची ताकद द्विगुणित करण्यासाठी ही मुद्रा केली जाते. यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक तणावापासून सुटका मिळते. अंतर्मनाची उर्जा वाढवण्यासाठी आणि कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी नियमित उत्तरबोधी मुद्रा आसन करावे. या आसनामुळे तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचा आनंद संप्रेरक बाहेर पडून जातो. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचे खूप खोलवर निरीक्षण करू शकता.
मेंदूमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी उत्तरबोधी आसन अतिशय प्रभावी ठरते. हे आसन केल्यामुळे कामावरील लक्ष वाढते आणि कोणत्याही क्षेत्रात खूप खोलवर आणि परिश्रमपूर्वक काम करण्याची इच्छा निर्माण होते. सकाळी ४ ते ६ दरम्यान कोणतेही योगासने किंवा ध्यानसाधना केल्यास शरीराला अनेक मनाला भरमसाट फायदे होतात. ब्रह्म मुहूर्ताला सकारात्मक उर्जेचा प्रवाह दिवसाच्या तुलनेत १० पट जास्त असतो. या मुद्रेचा सराव लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोणतीही व्यक्ती करू शकते. एका जागेवर १० मिनिटं शांत बसून उत्तरबोधी मुद्रा आसन केल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम आरोग्यावर आणि मनावर दिसून येतील.
उत्तरबोधी मुद्रा आसन हे जगातील सगळ्यात शक्तिशाली आसन मानले जाते. प्रामुख्याने करोडपती व्यक्ती किंवा श्रीमंत व्यक्ती हे आसन करतात. हे आसन करताना सगळ्यात आधी तुमचे अंगठे एकत्र आणावे. त्यानंतर सर्व बोटांना एका सरळ रेषेत ठेवावे. या स्थितीमध्ये १० मिनिटं शांत बसून राहिल्यास मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. अभ्यास करताना किंवा कोणत्याही व्यक्तीशी बोलताना उत्तरबोधी मुद्रा आसनात बसल्यास अनेक सकारात्मक गोष्टी घडतात.
Ans: 'उत्तर' म्हणजे वरची दिशा आणि 'बोधी' म्हणजे जागृती. त्यामुळे, ही मुद्रा ऊर्जेला वरच्या दिशेने नेऊन चेतना जागृत करते.
Ans: नाही, ही मुद्रा ध्यानधारणेसाठी आणि आंतरिक शांतीसाठी वापरली जाते, जी कोणत्याही ध्यान सत्रात केली जाऊ शकते.
Ans: होय, भगवान बुद्धांच्या अनेक मुद्रांपैकी ही एक मुद्रा आहे, जी ज्ञानप्राप्ती दर्शवते.