मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान
सतत स्क्रोल केल्यामुळे मेंदूचे आरोग्याचे होणारे नुकसान?
मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर कोणता परिणाम होतो?
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, शॉर्ट व्हिडीओ पाहण्याची वाढती सवय तरुणांमध्ये मेंदूच्या लक्ष नियंत्रण क्षमतेवर नकारात्मक परिणाम करत असल्याचे नवीन वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. चीनच्या झेजियांग विद्यापीठ येथील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. आजच्या डिजिटल जीवनशैलीत ‘रोल्स’, ‘शॉर्ट्स’ आणि छोटी व्हिडीओ सामग्री ही दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. मात्र, या सवयीचे मेंदूवर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम चिंताजनक असल्याचे संशोधकांचे मत आहे. (फोटो सौजन्य – istock)
प्रश्नावली तसेच स्व-नियंत्रण मापन चाचणी (सेल्फ कंट्रोल टेस्ट) घेण्यात आली. यानंतर सहभागींना अटेन्शन नेटवर्क टेस्ट (एएनटी) नावाची न्यूरोमानसशास्त्रीय परीक्षा देण्यात आली आणि त्या वेळी त्यांच्या मेंदूची इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) नोंद घेण्यात आली. या संशोधनासाठी संशोधकांनी २१ वर्षे सरासरी वय असलेल्या ४८ तरुणांना सहभागी करून घेतले. त्यांना दोन चाचण्या देण्यात आल्या. यात मोबाईल फोन शॉर्ट व्हिडिओ व्यसन प्रवृत्ती आली आहे.
रील्सचे व्यसन केवळ तरुणाईलाच नाही तर ते सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक स्तरातील स्त्री-पुरुषांना जडत आहे. रिकाम्या वेळांमध्ये शॉर्ट व्हिडीओ किंवा रोल्स पाहण्याकडे लोकांचा कल असतो. एकदा रील्स पाहण्यात माणूस व्यक्त झाला की, तो त्यात तासन्तास गुंतून जातो.हे निष्कर्ष तरुण पिढीसाठी चिंताजनक असून डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या तातडीच्या, वेगवान आणि उतेजनात्मक साहित्यामुळे मेंदू हळूहळू दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेपासून दूर जात आहे, या वृतीमुळे तरुणांच्या मेंदूची कार्यक्षमता क्षीण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलांना शालेय वयापासूनच व्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य धोरणांत हस्तक्षेपाची गरज आहे, असे डॉ. सुरेश पाटील, मनोसोपचार तज्ज्ञ म्हणाले.
सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम
लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते
निर्णय घेण्याची आणि नियंत्रण देवण्याची क्षमता कमी होऊ शकते
मेदूचा कार्यकारी विभाग (प्रीफटल कॉर्टक्स) कमी सक्रिय होऊ शकली.
Ans: मेंदू हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे, जो विचारा, भावना, स्मृती, हालचाली आणि शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतो.
Ans: प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन सुमारे १.३ ते १.४ किलो (१३००-१४०० ग्रॅम) असते, जे शरीराच्या वजनाच्या सुमारे २% असते.
Ans: जेव्हा मेंदू थकतो आणि दैनंदिन गोष्टी आठवत नाहीत, कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, अशा स्थितीला 'ब्रेन फॉग' म्हणतात. हे मानसिक थकव्याचे लक्षण असू शकते.






