२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आले होते 'हे' घरगुती उपाय
२०२५ मध्ये हळदीच्या ट्रेंडला सर्वाधिक पसंती का?
हळदीच्या पाण्याचे शरीराला होणारे फायदे?
नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. AI आधारित स्किन-अॅनालिसिस, स्मार्ट डिव्हायसेस आणि हाय-टेक उपचार सोशल मीडियावर कायमच ट्रेंडिंग असतात. सोशल मीडिया पाहून अनेक वेगवेगळे स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन फॉलो केले जाते. त्यातील वारंवार सर्च करण्यात आलेला ट्रेंड म्हणजे Haldi Trend. सोशल मीडियाचा वापर करून अनेक नवनवीन गोष्टी शिकल्या जातात. तसेच तिथे दाखवल्याप्रमाणे स्किन केअर आणि इतर अनेक गोष्टी केल्या जातात. सौंदर्याची खरी मजा साध्या सोप्या गोष्टींमध्ये दडलेली असते. हळदी ट्रेंड केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस झाला होता. या ट्रेंडने संपूर्ण जगाला वेड लावले होते. भारतीय आयुर्वेदातून जगभराला ‘नैसर्गिक ग्लो’चे सौंदर्य वेड लागले आहे. (फोटो सौजन्य – istock)
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद संपूर्ण शरीरासाठी अतिशय प्रभावी आणि फायदेशीर आहे.पदार्थाची चव, रंग आणि सुगंध वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते. पण सोशल मीडियावर हळदीचे पाणी नव्या रूपाने सगळ्यांसमोर आले आहे. कच्या ग्लासातून हळदीचा दिसणारा आकर्षक पिवळा रंग सगळ्यांचं खूप आकर्षित करतो. काचेच्या पाण्यातील हळदीचे दृश्य दिसायला अतिशय साधे असले तरीसुद्धा मनाला शांतता देणारे आहे. केमिकल ट्रीटमेंटच्या वापरापेक्षा नैसर्गिक उपाय प्रभावी आहेत, हे हळदी ट्रेंडमुळे साऱ्यांचं समजून आले आहे.
हळदी ट्रेंडमुळे लोकांनी नैसर्गिक उपाय करण्यास मोठी पसंती दर्शवली आहे. कायमच बाजारातील महागडे प्रॉडक्ट आणि ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक उपाय सुद्धा तितकेच प्रभावी आहेत. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात हळद मिक्स करून उपाशी पोटी सेवन करणे, हळदीच्या पाण्याचा फेस मिस्ट इत्यादींचा वापर केला जातो. याशिवाय किचनमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचे एकमेव कारण म्हणजे हळदीमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म.
यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर हळदी ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे २०२५ या वर्षात ग्लोइंग स्किनसाठी हळदीच्या पाण्याचा ट्रेंड सार्वधिक शोधण्यात आला होता. सुंदर त्वचेसोबतच संपूर्ण शरीरासाठी हळदीचे पाणी प्रभावी आहे. हळदीच्या पाण्याचा ट्रेंड केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हळदी ट्रेंड फेमस झाला होता. याचे सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.






