रक्तातील साखरेची पातळी थोडी जरी वाढली तरी ओढवू शकतो हार्ट अटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा आणि बचावासाठी या 6 गोष्टी लक्षात ठेवा
मधुमेह हा एक भयंकर आजार असून वृद्धांमध्येच काय तर लहान मुलांमध्येही हा आजार आता झपाट्याने वाढू लागला आहे. या आजारात शरीराच्या अनेक भागांवर, विशेषतः हृदयावर परिणाम होतो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. शरीरात पुरेसे इन्शुलिन तयार होत नाही किंवा शरीर तयार झालेल्या इन्शुलिनचा योग्य प्रकारे वापर करत नाही. मधुमेह रुग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शरीरात जरा जरी साखरेचे प्रमाण वाढले तर त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे शकते. यातीलच एक म्हणजे हृदयविकाराचा झटका!
रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात
आजकाल अनेकांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. हृदयाला नीट रक्तपुरवठा मिळाला नाही किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की ही आरोग्य समस्या निर्माण होतो. एकदा का तुम्हाला हा झटका आला तर यातून तुमचा जीव वाचणे फार कठीण आहे. अनेकांचा यात जागीच मृत्यू झाला आहे अशात वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन यापासून दूर राहिलेलेच बरे… मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. आज आपण या लेखात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणकोणती पाऊले उचलणे गरजेचे आणि फायद्याचे ठरते ते जाणून घेणार आहोत.
रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नुकसान करते?
रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंती कडक होऊ लागतात ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो. यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात रक्त मिळत नाही ज्यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता वाढते. याशिवाय शरीरात जर चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होत असेल तर आणि वाईट कोलेस्ट्रॉल जर वेगाने वाढत असेल तर याचा रक्तवाहिन्यांवर चुकीचा परिणाम होतो, यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या लयीवर परिणाम होऊन आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज देखील निर्माण करू शकते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
शरीरातल्या साखरेचे प्रमाण वेळोवेळी चेक करत जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध किंवा इन्सुलिन घ्या. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जसे की हिरव्या भाज्या, डाळी आणि धान्य यांचे सेवन करा.
बाहेरचे अन्न टाळा
तळलेले, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा अथवा कमी प्रमाणात यांचे सेवन करा. यासहच आपल्या आहारात मिठाचे प्रमाण जरा कमी करा. ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थहृदयासाठी फायदेशीर असतात त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात अशा पदार्थांचे सेवन करायला सुरुवात करा.
नियमित व्यायाम करा
व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा असतो. दररोज न चुकता अर्धा तास व्यायाम करत चला. तुम्ही योगासने देखील करून शकता, यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि मनावरील ताणही कमी होतो. वजन नियंत्रित नसल्यास लठ्ठपणाची समस्या जाणवते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल तर वेळीच यापासून दूर रहा , हे तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
ताण कमी करा
ध्यान किंवा योगा करून शरीराचा आणि मनाचा ताण कमी केला जाऊ शकतो. दररोज किम ७-८ तास झोप घ्या.
नियमित हृदय तपासणी करा.
मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा ईसीजी, कोलेस्टेरॉल आणि हृदयाच्या फंक्शनच्या टेस्टिंग्स करायलाच हव्यात. असे केल्याने आपल्या हार्टची वेळोवेळची स्थितीची आपल्याला माहिती मिळते.
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे काय आहेत?
धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे काय आहेत?
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ आणि उलट्या, डोकेदुखी आणि चक्कर येणे, अस्वस्थता आणि भीती.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.