Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याला मरण नाही तरीही बाटलीवर Expiry Date का असते ?

पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 14, 2025 | 04:08 PM
पाण्याला मरण नाही तरीही बाटलीवर Expiry Date का असते ?
Follow Us
Close
Follow Us:

अन्न वस्त्र आणि निवारा याचबरोबर पाणी देखील जीवनावश्यक आहे. या पाण्याशिवाय कोणताही सजीव तग धरु शकत नाही. असं म्हणतात की पाण्याला मरण नाही, मात्र तरीही पाण्याच्या बाटलीवर Expiry Date असते ? या प्रश्नाबाबत अनेकांना गोंधळायला होतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. खरंतर पाण्याला कुठल्याही प्रकारची Expiry Date नसते. वर्षानुवर्ष पाणी चांगलेच राहते. मात्र पाण्याच्या बाटलीवर लिहिलेली Expiry Date ही त्या बाटलीची असते. साधारणत: विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या या प्लास्टीकच्या असतात. हे प्लास्टीक प्रक्रिया करुन वापरलेले असते त्यामुळे या बाटलीची Expiry Date असते. पाण्याच्या बाटल्या या रासायनिक प्रकिया करुन वापरल्य़ा जातात.त्यामुळे कालांतराने या बाटल्यांमधील रासायनिक प्रक्रियेमुळे पाणी दुषित होत. हे दुषित पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याचा गंभीर परिणाम शरीरावर होेऊ नये यासाठी पाण्याच्या बाटल्यांवर Expiry Date लिहिलेली असते.

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक खाद्यपदार्थावर आणि पेयावर expiry date असणं अनिवार्य आहे. पाण्याच्या बाटलीवर expiry date कारणं म्हणजे पाणी खराब न होता, बाटली खराब होऊ शकते. त्यामुळे शुद्धतेची हमी फक्त एका मर्यादित कालावधीसाठीच दिली जाते. म्हणूनच पाण्याच्या बाटलीवर Expiry Date असते.जास्त काळ साठवलेल्या बाटल्यांमध्ये बाहे्रील वातावरण, धूळ, उष्णता, थंडी यांचा परिणाम होतो. यामुळे बाटलीतील पाणी विषारी किंवा दूषित होण्याचा धोका असतो.पाण्याच्या बाटल्या सहसा PET (Polyethylene Terephthalate) या प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. वेळोवेळी, विशेषतः उष्णतेत, हे प्लास्टिक केमिकल्स (जसे की BPA) पाण्यात मिसळू शकतात, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक (बहुतेक PET – Polyethylene Terephthalate) ही काही प्रमाणात रासायनिक बदलांना बळी पडू शकते. वेळेनुसार ही प्लास्टिकची बाटली तापमान, प्रकाश आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यास त्यातून घातक रसायने (जसे की अँटीमनी किंवा BPA) पाण्यात मिसळू शकतात. त्याचप्रमाणे, एकदा जरी पाण्याची बाटली वापरली तरी त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते, आणि त्यामुळे पाणी दूषित होऊ शकते. expiry date ही ग्राहकांना सावध करण्याचा इशारा आहे की, वापरत असलेल्या बाटलीचा कार्यकाळ किती आहे ते. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी expiry date दिली जाते. जरी पाणी “नैसर्गिकरित्या” नासणारे नसलं, तरी साठवणूक माध्यमामुळे त्याला expiry date दिली जाते. त्यामुळे, तुम्ही पाण्याची बाटली खरेदी करताना Expiry Date तपासणं नेहमीच आवश्यक आहे.

त्वचेच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल नारळाचे दूध! ‘या’ पद्धतीने करा त्वचेसाठी वापर, चेहरा दिसेल तेजस्वी

 

Web Title: Even though water is not dead why is there an expiration date on a mineral water bottle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • health
  • Lifestyles
  • water

संबंधित बातम्या

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा
1

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
2

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर
3

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट
4

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.