Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी, चरबीचे थर होतील कायमचे नष्ट

पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी चुकीच्या जीवनशैली फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 24, 2025 | 01:25 PM
शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी

शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी

Follow Us
Close
Follow Us:

लठ्ठपणा वाढण्याची कारणे?
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय?
पोटावरील चरबीचा घेर कमी करण्यासाठी काय करावे?

कधी काळी अख्खा पिझ्झा खाऊनही फारसे कष्ट न घेता आपले वजन पूर्ववत व्हायचे, आठवतात का ते दिवस? पण हाय गेले ते दिन गेले, असे म्हणायची वेळ वाढत्या वयामुळे ओढवली आहे का? आपल्या शरीराच्या मेटाबोलिझमचा एक दर असतो. त्याला बीएमआर म्हटले जाते. आरामाच्या स्थितीत असताना किती ऊर्जा खर्च करतो त्याचे मोजमाप म्हणजे बीएमआर. वाढत्या वयानुसार चयापचयक्रियेचा वेग कमी होतो हे जरी खरे असले तरीही त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न आपण करू शकतो. (फोटो सौजन्य – istock)

कार्डिओ प्रकारातील व्यायाम:

आपल्या स्नायूंच्या वजनात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची घट व्यायामाच्या अभावी होऊ शकते. कार्डिओ म्हणजे वेगात केले जाणार्या व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज जळत्तात आणि व्यक्तीला कृतिशील, उत्साही राहाण्यास मदत होते. चालणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा प्रकारातील व्यायाम तीस मिनिटे करावा. त्यामुळे सर्वांगाचा व्यायाम होतो. हळूहळू वेळ वाढवल्यास स्टॅमिना आणि सहनशक्ती दोन्हीतही वाढ होते.

‘या’ चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत, पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

ध्यानधारणा:

आपल्या बीएमआर आणि एकूण आरोग्यावर अतिताणाचा परिणाम होत असतो. तणाव असताना कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक आपल्या भुकेची जाणीव वाढवतात आणि तृप्ततेची भावना येऊ देत नाहीत. वाढते वय असले तरीही यामुळे चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात, त्यासाठी ध्यानधारणा खूप मदत करू शकते. ध्यानधारणा केल्याने लक्ष केंद्रीत करणे सहज शक्य होते. आपला ताबा तणावाने घेण्याआधीच ध्यानधारणेने तणावाला आपल्या काबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा.

चुकीच्या आहार:

कोणत्यातरी चुकीच्या डाएटच्या नादी लागू नये. आरोग्यदृष्ट्या योग्य आहार घ्यावा. आपल्या जीवनशैलीत आहाराती चदल करावेत, पण झटपट डाएटच्या नादी लागू नये. चुकीच्या पद्धतीने केलेल्या डाएटमुळे वजन पटकन कमी होईल मात्र आपल्या चयापचय क्रियेवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. फक्त वजन कमी करून नाही तर चरबीचे प्रमाण कमी केल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढवा आपली शारीरिक हालचाल जितकी अधिक होईल तितका प्रथिनयुक्त आहाराचे प्रमाण वाढवा, अनेकदा म्हातारपणी व्यक्ती स्थूल होतात कारण त्यांच्या स्नायूंचे वजन कमी होते आणि चरबीचे प्रमाण वाढते. आहारातील प्रथिनाचे प्रमाण वाढल्यास स्नायूंची वाढ होते आणि पेशींचे स्वास्थ वाढते.

ताकदीचे व्यायाम:

हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिग किवा उच्च क्षमतेच्या ताकदीच्या व्यायामांमध्ये मिनिटागणिक दुप्पट किया तिप्पट उष्मांक खर्च होतात. तेच कार्डियो प्रकारात हे प्रमाण कमी असते. ताकदीच्या किवा वजन उचलण्याचा व्यायाम संपल्यावरही शरीरातील उष्मांक काही काळ जळत राहतात.

झोप:

स्नायूंच्या वृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप ही खूप अधिक महत्वाची असते. मानवाला आठ तासांची झोप गरजेची आणि पुरेशी असते. मात्र, अनेकांना आठ तास झोप मिळत नाही. अपुर्या झोपेमुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढते. तसे चरबी कमी होण्याचा वेगही कमी होतो. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहेच पण जेवल्या जेवल्या लगेचच झोपू नये, हे देखील खरेच आहे. कारण जेवण पचण्यास काही कालावधी लागत असतो.

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पदार्थाचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

पाणी:

आपल्याला बीएमआर व्यवस्थित ठेवायचा असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी पिणे, सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे ही चरबी वितवळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटतेच तसेच चरबी कमी होण्यासही मदत होते. पाण्याशिवाय फळांचा रस किंवा औषधी वनस्पती टाकलेले पाणीही नक्कीच चांगला पर्याय आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Excess body fat will be reduced in a month follow these habits in your daily life home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

वाढत्या थंडीत कायमच राहाल फिट आणि मजबूत! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, कधीच पडणार नाही आजारी
1

वाढत्या थंडीत कायमच राहाल फिट आणि मजबूत! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, कधीच पडणार नाही आजारी

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पदार्थाचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
2

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पदार्थाचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

‘या’ चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत, पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका
3

‘या’ चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत, पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

आतड्यांचा प्रत्येक कोपरा होईल मुळांपासून स्वच्छ! डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, उद्भवणार नाही कॅन्सरचा धो
4

आतड्यांचा प्रत्येक कोपरा होईल मुळांपासून स्वच्छ! डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, उद्भवणार नाही कॅन्सरचा धो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.