उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग नियमित करा 'या' पदार्थाचे सेवन
जेवण बनवताना अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यात आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे खोबरं. कोणतीही पालेभाजी किंवा फळ भाजी बनवल्यानंतर त्यात सुकं किंवा ओल खोबर किसून टाकले. यामुळे भाजीला गोडसर आणि सुंदर चव लागते. ओल्या खोबऱ्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सुक्या खोबऱ्यापासून वाटप बनवले जाते. यामध्ये प्रथिने, फायबर, सेलेनियम, तांबे, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळून येतात. फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतड्यांचे कार्य सुरळीत राहते. (फोटो सौजन्य – istock)
सुक्या खोबऱ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. सुके खोबरे हे हदय, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. नारळात हेल्दी फॅट असते, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि सेलेनियम, फायबर, कॉपर आणि मँगनीजचे प्रमाण देखील अधिक असते. या सर्वांचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. याबाबत माहिती जाणून घेऊया.
सुक्या नारळामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सुक्या नारळाचा समावेश करू शकता.सकाळी उठल्यानंतर सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा चावून खाल्ल्यास महिनाभरात रक्ताची पातळी भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
सुक्या खोबऱ्यामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे याच्या सेवनाने लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण होते. अनेक पोषक घटक शरीराला मिळतात.
आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो. स्मरणशक्ती वाढते. मानसिक आरोग्यासाठी खोबरे महत्वाचे आहे. यामध्ये असलेले सेलेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे जे शरीराला एंजाइम तयार करण्यास मदत करते.
सुक्या खोबऱ्यामध्ये असलेले तांबे ऊर्जा पातळीला समर्थन देते चयापचय वाढवते तसेच लाल रक्तपेशी आणि कोलेजन तयार होण्यास मदत होते. रक्तदाब आणि हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी शरीराला फायबरची गरज असते. वाळलेल्या खोबऱ्यामध्ये फायबर जास्तप्रमाणात असते त्यामुळे स्ट्रोक मधुमेह उच्च रक्तदाबाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
Ans: रक्तदाब म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब.
Ans: 120/80 mmHg पेक्षा कमी.
Ans: अनेकदा उच्च रक्तदाबाची कोणतीही ठळक लक्षणे नसतात, म्हणून त्याला 'सायलेंट किलर' म्हणतात.






