
स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे वाढतो दुय्यम काचबिंदूचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
मुंबई: भारतभरातील डॉक्टर स्टेरॉइडच्या व्यापक आणि अनेकदा विनापरवानगी वापराबद्दल चिंता व्यक्त करत असून ते दुय्यम स्वरुपाच्या काचबिंदू (सेकंडरी ग्लुकोमा)साठी एक प्रमुख ट्रिगर म्हणून उदयास येत आहे, ही एक दृष्टी-धोकादायक स्थिती आहे ज्यामुळे कधीही ठीक न होणारे अंधत्व येऊ शकते. सामान्यतः अॅलर्जी, त्वचेची स्थिती, श्वासोच्छवासाच्या आजार आणि अगदी ओव्हर-द-काउंटर डोळ्यांत टाकता येणारे औषधे (ड्रॉप) म्हणून वापरली जाणारी स्टेरॉइड दीर्घ कालावधीसाठी वापरल्यास डोळ्यांवरील दाब लक्षणीयरीत्या वाढू शकतो. बहुतेकदा डोळ्यांच्या मज्जातंतू म्हणजेच ऑप्टिक नर्व्हला होणारे दीर्घकालीन नुकसान रुग्णांच्या लक्षात येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
फिरण्याचे शौकीन आहात? मग Travel Insurance चे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत…
भारतात अगोदरच अंदाजे 12-13 दशलक्ष व्यक्ती काचबिंदूसह जगत आहेत. ही आकडेवारी जागतिक भारापैकी सुमारे एक षष्ठांश आहे. जागतिक स्तरावर, काचबिंदू सुमारे 75-80 दशलक्ष व्यक्तींना प्रभावित करतो. ही संख्या 2040 पर्यंत 110 दशलक्षाहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. जगभरात कधीही बऱ्या न होऊ शकणाऱ्या अंधत्वाचे प्रमुख कारण असूनही, भारतात काचबिंदूचे मोठ्या प्रमाणात निदान झालेले नाही. जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून भारतभरातील मधुमेहींना मोफत काचबिंदू (ग्लुकोमा) उपचार उपलब्ध करून देत आहे. आपली अपॉइंटमेंट नक्की करण्यासाठी 95949 01868 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही ऑफर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे.
विशेषतः चिंताजनक बाब म्हणजे देशातील 85-90% काचबिंदू प्रकरणांचे निदान झालेले नाही. हा रोग शांतपणे वाढत जातो आणि लक्षणे स्पष्ट होईपर्यंत, कधीही ठीक न होऊ शकणाऱ्या डोळ्यांतील मज्जातंतू (ऑप्टिक नर्व्ह)चे नुकसान अनेकदा आधीच झाले आहे. उशीरा निदान झाल्यास अंधत्व टाळता येत नाही. जीवनाचा दर्जा कमी होतो आणि लक्षणीय सामाजिक-आर्थिक परिणाम होतो.
मुंबई, येथील डॉ.अगरवाल्स आय हॉस्पिटल, क्लिनिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. मनीष शाह म्हणतात, “विशेषतः वैद्यकीय देखरेखीशिवाय स्टेरॉइड किंवा डोळ्यांचे ड्रॉप वापरणाऱ्या रुग्णांमध्ये स्टेरॉइड-प्रेरित काचबिंदू (steroid-induced glaucoma)मध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास येते आहे.”
गेल्या दोन ते तीन वर्षांत, वृद्धांची लोकसंख्या, मधुमेह आणि मायोपियाचे प्रमाण अधिक वाढले आहे. निदान तंत्रज्ञानातील प्रगती आणि सुधारित सार्वजनिक जागरूकता यामुळे निदान झालेल्या ग्लुकोमा केसमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांनी नोंदवले आहे. तथापि, तज्ज्ञांनी सावध केले आहे की अशा प्रकरणांचे वाढते प्रमाण हे दीर्घकालीन किंवा देखरेख न केलेल्या स्टेरॉइडच्या वापरामुळे होणाऱ्या दुय्यम काचबिंदू म्हणजेच सेकंडरी ग्लुकोमाशी जोडलेले आहे. वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाद्वारे लवकर निदान झाल्यास तसेच त्यावर लक्ष दिल्यास जोखीम टाळता येते.
काचबिंदूचे निदान सामान्यतः 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये केले जाते. ज्याचे उच्च प्रमाण 50 ते 70 वयोगटात आढळते. विशेषतः विकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या किंवा दुय्यम ट्रिगर्स असलेल्या व्यक्तींमध्ये; किशोरवयीन तसेच कमी वयात काचबिंदू उद्भवण्याचे प्रमाण वाढल्याचे चिकित्सकांचे म्हणणे आहे. प्रायमरी ओपन-अँगल ग्लुकोमा हा सर्वात प्रचलित प्रकार आहे. त्यानंतर प्रायमरी अँगल-क्लोजर डिसीज; तर स्टेरॉइड-इंडयूस् ग्लुकोमा आणि स्यूडोएक्सफोलिएशन ग्लुकोमा (pseudoexfoliation glaucoma) देखील वैद्यकीय तपासणीत वारंवार दिसून येतात.
“परिधीय दृष्टीतील बदल (peripheral vision) किंवा दिव्यांच्या सभोवतालच्या प्रभामंडळासह अस्पष्ट दृष्टीकडे रुग्ण वारंवार दुर्लक्ष करतात. सुरुवातीला मध्यवर्ती दृष्टी स्पष्ट असल्याने निदानास अनेकदा विलंब होतो,” असे डॉ. मनीष शाह पुढे सांगतात.चांगली दृष्टी म्हणजे निरोगी डोळे, ग्लुकोमा केवळ वृद्ध व्यक्ति किंवा प्रौढांवरच परिणाम करतो अथवा डोळ्यांवरील सामान्य दाब हा रोग टाळतो अशा सामान्य दंतकथांत डॉक्टर सावधगिरी बाळगायचा सल्ला देतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड विकार, उच्च मायोपिया, दीर्घकालीन स्टेरॉइडचा वापर किंवा बालपणात झालेल्या दुखापतींसह डोळ्याच्या दुखापतीचा इतिहास असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो. त्याचप्रमाणे त्यांची वार्षिक डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.
Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्य राहील परफेक्ट
काचबिंदू जागरूकता महिन्याचा एक भाग म्हणून, नियमित डोळ्यांच्या चाचण्या महत्त्वाच्या आहेत यावर तज्ज्ञ भर देतात. सुमारे 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची दर एक ते दोन वर्षांनी सर्वसमावेशक तपासणी केली पाहिजे, तर उच्च-जोखीम गटांना वार्षिक मूल्यांकनाची आवश्यकता असते. डोळ्यांचा दाब आणि डोळ्यांच्या मज्जातंतू (ऑप्टिक नर्व्ह)च्या आरोग्याचे मूल्यांकन केल्याशिवाय केवळ दृष्टीविषयक चाचण्या अपुऱ्या आहेत.
Ans: काचबिंदू हा डोळ्यांच्या एका समूहाचा रोग आहे, ज्यात डोळ्यातील दाब वाढतो.
Ans: गाजर, पालक, भोपळी मिरची.सॅल्मन, ट्यूना मासे, अक्रोड, चिया बिया.
Ans: डोळे गोलाकार फिरवा, जवळ आणि दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करा.