
Eye Mucus: सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो? 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा दृष्टी होईल कमी
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांच्या कडांभोवती पाणीदार किंवा पांढरा चिकट थर जमा होत असेल तर डोळे सुकणे, ॲलर्जी किंवा जळजळीमुळे असू शकते. ॲलर्जीमुळे डोळ्यांना खाज येणे , लालसरपणा आणि पाणी य़ेणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. अश्रूंची नलिका बंद झाल्यामुळे एकाच डोळ्यातून सतत पाणी येऊन चिकट म्युकस जमा होतो. पिवळा किंवा हिरवा घट्ट चिपड डोळ्यांमधून बाहेर पडत असेल तर जिवाणू संसर्गाचे प्रमुख लक्षण आहे. हिरवा रंगाची चिपड अधिक गंभीर संसर्ग दर्शवते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही अँटीबायोटिक आय ड्रॉप्सचा वापर करू नये.
पापण्यांच्या कडांवर घट्ट पापडी जमा होण्याला ब्लेफेरायटिस असे म्हणंटले जाते. जिवाणूंच्या वाढीमुळे खाज, जळजळ, डोळे लाल होणे आणि पापण्यांवर कोंड्यासारखे खवले जमा होऊन डोळ्यांचे आरोग्या बिघाडून जाते. डोळ्यांत वेदना होणे, प्रकाश सहन न होणे किंवा धुरकट दिसणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत. याशिवाय कॉन्टॅक्ट लेन्स लावताना वेदना किंवा लालसरपणा झाल्यास लगेच लेन्स बदलून टाकावेत.
सौम्य प्रमाणात चिपड जमा झाल्यास कापूस किंवा मऊ कपडा पाण्यात ओला करून घ्यावा. त्यानंतर डोळे स्वच्छ पुसून घ्यावेत. प्रत्येक डोळ्यासाठी वेगळा कापसाची निवड करावी. डोळ्यांसबधित कोणताही संसर्ग झाल्यास डोळ्यांना हात लावू नये. सतत हात लावल्यामुळे संसर्ग इतर ठिकाणीसुद्धा पसरु शकतो. रुमाल, उशी, आय मेकलप किंवा टॉवेल इतरांसोबत शेअर नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही अँटीबायोटिक किंवा स्टेरॉईडयुक्त ड्रॉप्स टाकू नये.