Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करण्यापासून हाडांचे-डोळ्यांचे आरोग्य सुधारते फरसबी, जेवणाला तयार करा झणझणीत भाजी; रेसिपी नोट करा

Farasbi Subji Recipe : जुन्या काळापासून खाल्ल्या जाणाऱ्या या भाजीन पोषकतत्वांना भरपूर साठा दडलेला आहे जो आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो. फरसबीच्या भाजीची झणझणीत रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 29, 2025 | 01:15 PM
वजन कमी करण्यापासून हाडांचे-डोळ्यांचे आरोग्य सुधारते फरसबी, जेवणाला तयार करा झणझणीत भाजी; रेसिपी नोट करा

वजन कमी करण्यापासून हाडांचे-डोळ्यांचे आरोग्य सुधारते फरसबी, जेवणाला तयार करा झणझणीत भाजी; रेसिपी नोट करा

Follow Us
Close
Follow Us:

फरसबी ही एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी आहे जी महाराष्ट्राच्या स्वयंपाकात नियमितपणे केली जाते. ही भाजी प्रथिनांनी समृद्ध असून त्यात भरपूर प्रमाणात तंतुमय घटक (फायबर) असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. फरसबीची भाजी विशेषतः दैनंदिन जेवणासाठी योग्य असते कारण ती हलकी, झटपट तयार होणारी आणि चवीने अप्रतिम असते. पारंपरिक मराठी स्वयंपाकात भाजी प्रामुख्याने बनवली जाते. तुम्ही रात्रीच्या जेवणात या भाजीचा समावेश करू शकता. पारंपरिक मसाले टाकून तयार केलेली झणझणीत फारसबीची भाजी चवीला फार छान लागते आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

साहित्य:

  • फरसबी – 250 ग्रॅम
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • लसूण – 4-5 पाकळ्या (ठेचून)
  • हिरवी मिरची – 2 (चिरलेली)
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गोडा मसाला – 1 टीस्पून (ऑप्शनल)
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर
  • पाणी – ¼ कप (गरजेनुसार)

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम फरसबी स्वच्छ धुवून तिचे दोन्ही टोक कापून घ्या आणि मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे टाका. फोडणी तडतडल्यावर त्यात हळद घाला.
  • आता त्यात बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता.
  • यानंतर त्यात फरसबीचे तुकडे घालून छान हलवा. 2 मिनिटं झाकण ठेवून परतवा.
  • आता त्यात लाल तिखट, धणे-जिरे पूड, गोडा मसाला आणि मीठ घाला. सगळं छान मिसळा.
  • थोडंसं पाणी शिंपडून झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर 8-10 मिनिटं फरसबी मऊ होईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये हलवत राहा.
  • भाजी शिजल्यावर शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि हलकेच मिसळा.
  • गरम गरम फरसबीची भाजी फुलके, पोळी किंवा वरण-भाताबरोबर सर्व्ह करा.
  • भाजी अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी थोडं किसलेलं नारळही वरून घालू शकता.
  • गोडा मसाला नसेल तर थोडा गरम मसाला वापरू शकता.

Bengali chaat: 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट गोड चवीचे बंगाली चाट चूरमूर, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

फरसबीचे आरोग्याला होणारे फायदे

हाडांना मजबूत करते – फरसबीमध्ये व्हिटॅमिन के, ए आणि कॅल्शियमचे मुबलक प्रमाण आढळून येते जे हाडांना मजबूत आणि बळकट बनवण्यास मदत करते.

पचन सुधारते – फरसबीमध्ये फायबर आढळून येते, जे पचनक्रिया सुरळीत करुन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

वजन नियंत्रित करते – फरसबीमध्ये फायबर आणि प्रथिनांचा साठा आढळला जातो जो वजन कमी करण्यास किंवा नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, याचे सेवन अधिक काळापर्यंत पोटाला भरलेले ठेवते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते – व्हिटॅमिन ए असल्याने फरसबीचे सेवन डोळ्यांसाठीही फायद्याचे ठरते.

Web Title: Farasbi improve bone and eye health help to lose weight know how to make its spicy subji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • healthy food
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’
1

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

Magnesium ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात वाढेल दुप्पट ऊर्जा
2

Magnesium ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात वाढेल दुप्पट ऊर्जा

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, आतड्यांचे आरोग्य राहील कायमच निरोगी
3

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, आतड्यांचे आरोग्य राहील कायमच निरोगी

व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे ‘सोया कबाब’;
4

व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे ‘सोया कबाब’;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.