Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन न करून सुद्धा Fatty liver चा त्रास वाढला आहे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे लिव्हर स्वच्छ होईल आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. जाणून घ्या फॅटी लिव्हरची लक्षणे आणि त्यावरील उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 05:30 AM
अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन न करून सुद्धा Fatty liver चा त्रास वाढला आहे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन न करून सुद्धा Fatty liver चा त्रास वाढला आहे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

फॅटी लिव्हर म्हणजे काय?
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?
फॅटी लिव्हरच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काय खावे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, चुकीच्या वेळी आहार आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर सुद्धा शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चुकीचा आहार, कमी शारीरिक हालचाल, लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी कारणांमुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. लिव्हरमध्ये अनावश्यक चरबीचा थर साचून राहिल्यामुळे फॅटी लिव्हर होण्यास सुरुवात होते, सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण कालांतराने लक्षणे तीव्र होतात आणि शरीराचे नुकसान करतात. चला तर जाणून घेऊया फॅटी लिव्हर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate Cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्

फॅटी लिव्हरची लक्षणे:

  • सतत तीव्र थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
  • पोटाच्या वरच्या उजव्या भागात हलक्या वेदना
  • अचानक किंवा न कळत वजन कमी होणे.
  • भूक मंदावणे.
  • त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
  • गडद रंगाची लघवी आणि फिकट किंवा काळ्या रंगाची विष्ठा होणे
  • शरीराला खाज सुटणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश:

फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर केवळ औषध उपचारच नाहीतर दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात योग्य आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हरवर वाढलेला अतिरिक्त तणाव कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. लिव्हरमध्ये साचून राहिलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात सगळ्यात आधी लसूणचा समावेश करावा. लसूण खाल्ल्यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात लसूणचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर असलेल्या भाज्या लिव्हरवर वाढलेला तणाव कमी करून लिव्हर हेल्दी ठेवतात.

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर

सकाळच्या नाश्त्यात कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स खावेत. ओट्स खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि पोट सुद्धा भरलेले राहते. फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दैनंदिन आहारात सुका मेवा सुद्धा खावा. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला चांगले फॅट्स मिळतात आणि लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्कोहोल न पिता देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो का?

    Ans: होय. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा आजार अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही होऊ शकतो. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि अयोग्य आहार यामुळे हा धोका वाढतो.

  • Que: फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र थकवा, पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा, वजन वाढणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

  • Que: लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, ओट्स, अक्रोड, बदाम, लिंबूवर्गीय फळे, बेरीज, हळद, लसूण आणि ऑलिव्ह ऑइल यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Fatty liver despite avoiding alcohol add these foods to your diet regularly to protect your liver health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • liver care

संबंधित बातम्या

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे
1

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम
2

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर
3

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.