
Jaslok Hospital
मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ३० वर्षीय जितिन शिर्के याच्यावर डिसेंबर २००७ मधील त्याच्या पहिल्या प्रत्यारोपणानंतर जवळपास १९ वर्षांनी दुसरे लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीरीत्या पार पाडले आहे. बालपणी ऑटोइम्यून सिरोसिसचे निदान झालेल्या जितिनवर वयाच्या ११ व्या वर्षी पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. (Jaslok hospital)
हे ऑपरेशन मुंबईतील एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तत्कालीन सीनियर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. एस. के. माथूर यांनी यशस्वीरीत्या केले होते, ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी आपल्या यकृताचा डावा अर्धा भाग दान केला होता. करिअर घडवत सामान्य दैनंदिन जीवनात परतल्यानंतर फेब्रुवारी २०२६ च्या मध्यापासून त्याला यकृताच्या आणखी एका जीवघेण्या समस्येला सामोरे जावे लागले, ज्यामध्ये पूर्वी प्रत्यारोपित केलेले यकृत शरीराने नाकारल्याने (रिफ्रॅक्टरी क्रॉनिक रिजेक्शन) दुसऱ्या प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली. ही शस्त्रक्रिया ५ जुलै २०२६ रोजी पार पडली, ज्यामध्ये त्याच्या आईने आपल्या यकृताचा उजवा अर्धा भाग दान केला. जितिनची प्रकृती आता सुधारत आहे आणि तो कामावर परतला आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमित रक्ततपासणीत जितिनच्या यकृताच्या कार्यात अचानक मोठा बिघाड झाल्याचे समोर आले. विविध चाचण्या आणि वैद्यकीय उपचार करूनही त्याची प्रकृती खालावत राहिली. त्याने जसलोक हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, चीफ हेपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. आभा नागराल यांच्याकडून सेकंड ओपिनियन घेतले, ज्या त्याच्या पहिल्या प्रत्यारोपणानंतर केअर टीमचा भाग होत्या. त्याच्या वैद्यकीय इतिहासाचा आढावा घेतल्यानंतर आणि उपचारांच्या पर्यायांचा विचार केल्यानंतर टीमने दुसऱ्या प्रत्यारोपणासाठी त्याचे मूल्यांकन केले.
जून महिन्याच्या शेवटी जितिनच्या शरीरातील अमोनियाची पातळी गंभीररित्या वाढली आणि शुद्ध हरपल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागले. त्याच्या यकृताचे कार्य अत्यंत खालावल्याने टीमने प्रत्यारोपण प्रक्रियेला गती दिली. त्याच्या आईचे यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचे आढळले आणि ५ जुलै २०२६ रोजी हे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या डायरेक्टर, चीफ हेपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. आभा नागराल म्हणाल्या, “जितिनचा हा प्रवास प्रत्यारोपित यकृताची दीर्घकाळ देखभाल करण्यातील गुंतागुंत दर्शवतो. वैद्यकीय उपचारांनंतरही त्याची प्रकृती खालावली, तेव्हा दुसरे प्रत्यारोपण करणे आवश्यक बनले. त्याच्या या केसमधून निदर्शनास येते की, प्रत्यारोपणानंतर आयुष्यभर औषधोपचार घेणे, नियमित फॉलो-अप आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचे आहे.”
पुन्हा लिव्हर ट्रान्सप्लांट करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यासाठी प्राप्तकर्ता आणि दात्याचे काळजीपूर्वक मूल्यांकन, सविस्तर शस्त्रक्रिया नियोजन आणि शस्त्रक्रियेनंतर अतिदक्ष देखभालीची आवश्यकता असते. जितिनच्या या केसमधून प्रत्यारोपणानंतर आयुष्यभर इम्युनोसप्रेसंट औषधे घेणे, नियमित देखरेख ठेवणे आणि वैद्यकीय सल्ल्यांचे काटेकोर पालन करण्याचे महत्त्व देखील स्पष्ट होते. त्याच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणेमध्ये हेपॅटोलॉजी, अॅनेस्थेशिया, क्रिटिकल केअर, नर्सिंग आणि इतर क्लिनिकल सेवांमधील तज्ज्ञांच्या सहयोगाने जसलोक हॉस्पिटलच्या ट्रान्सप्लांट आणि सर्जिकल टीम्सचे समन्वित प्रयत्न कारणीभूत ठरले.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. अमित रस्तोगी म्हणाले, “दुसरे लिव्हर ट्रान्सप्लांट विशेषतः रुग्ण गंभीर आजारी असल्यास टेक्निकली आणि क्लिनिकल दृष्टिकोनातून अत्यंत आव्हानात्मक असते. जितिनचे यशस्वी प्रत्यारोपण हे ट्रान्सप्लांट, सर्जिकल आणि क्रिटिकल-केअर टीम्समधील काटेकोर नियोजन आणि जवळच्या समन्वयाचे फलित आहे. आपल्या यकृताचा एक भाग दान करण्याचा त्याच्या आईचा निर्णय ही शस्त्रक्रिया शक्य होण्यासाठी महत्त्वाचा ठरला.”
डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष, झेडटीसीसी म्हणाले, “जितिनच्या या प्रवासामधून निदर्शनास येते की, अवयव प्रत्यारोपण जीवन बदलू शकते आणि प्राण वाचवू शकते. मी वयाच्या ११ व्या वर्षी त्याचे पहिले प्रत्यारोपण केले होते, जेव्हा त्याचे वडील अत्यंत कठीण आर्थिक टप्प्यातून जात असतानाही यकृताचा भाग दान करण्यासाठी पुढे आले होते.
२००७ मध्ये फारच कमी हॉस्पिटल्स लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट करत होती. योग्य जिवंत दात्यांची उपलब्धता आणि प्रत्यारोपणाची वेळेवर मिळणारी सुविधा महत्त्वाची असली, तरी अशा केसेसमध्ये यकृताचे पुन्हा प्रत्यारोपण करण्याचे सर्जिकल कौशल्य आणि अनुभवी हेपॅटोलॉजिस्ट व इंटेन्सिव्हिस्ट असणे हे यशस्वी प्रत्यारोपणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. जिवंत दात्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्रेन स्टेम डेथनंतर (मेंदू मृत झाल्यानंतर) अवयवदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे सीईओ श्री. जितेंद्र हरियाण म्हणाले, “जितिनचा प्रवास गुंतागुंतीच्या वैद्यकीय केसेसमध्ये क्लिनिकल कौशल्य, बहुविद्याशाखीय सहयोग आणि रुग्णाची सातत्यपूर्ण देखभाल यांचे महत्त्व निदर्शनास येते. त्यांच्या मदतीसाठी एकत्र येऊन प्रयत्न करणाऱ्या सर्व टीम्सचा आम्हाला अभिमान आहे. तसेच, त्यांच्या आई-वडिलांनी दाखवलेल्या असामान्य उदारतेबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.”
पहिले आणि दुसरे लिव्हर ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण श्री. जितिन शिर्के म्हणाले, “या कठीण काळात माझी काळजी घेतल्याबद्दल, मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्याबद्दल मी डॉ. आभा नागरल, डॉ. एस. के. माथूर, डॉ. अमित रस्तोगी आणि जस्लोक हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचा मनापासून आभारी आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अथक प्रयत्न करणारे ट्रान्सप्लांट सर्जन, क्रिटिकल केअर तज्ज्ञ, नर्सेस आणि इतर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
माझा जीव वाचवण्यासाठी आपल्या लिव्हरचा काही भाग दान करणाऱ्या माझ्या आई-वडिलांचा आणि प्रत्येक क्षणी माझ्या सोबत असलेल्या माझ्या होणाऱ्या पत्नीचा मी सदैव ऋणी राहीन. माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी आता बरा होत आहे आणि पुन्हा कामावर रुजू होत आहे, याचा मला मनापासून आनंद आणि कृतज्ञता वाटते.”
जितिनचा अनुभव प्रत्यारोपणानंतर सततच्या वैद्यकीय देखभालीचे महत्त्व, जिवंत अवयवदानाची भूमिका आणि रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली इम्युनोसप्रेसंट औषधे नियमितपणे घेणे व नियमित फॉलो-अप्सना उपस्थित राहण्याची गरज अधोरेखित करतो. त्याची ही प्रकृती सुधारणा म्हणजे जवळपास दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या वैद्यकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.