Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

विटामिन बी १२ कमी झाल्यांनतर वेळीच लक्ष न दिल्यास मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 08:03 AM
विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा 'या' पावरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा 'या' पावरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

Follow Us
Follow Us:

विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे?
दैनंदिन आहारात कोणता बदल करावा?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?

निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची खूप जास्त आवश्यकता असते. विटामिन बी १२, विटामिन सी, ए, डी इत्यादी सर्वच विटामिन शरीर कायमच निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यातील अतिशय महत्वाचे जीवनसत्व म्हणजे विटामिन बी १२. धावपळीची जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे वेळीच लक्षणे देणे फार आवश्यक आहे, अन्यथा आरोग्य बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. विटामिन बी १२ मानवी शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. यामुळे तांबड्या रक्तपेशींची निर्मिती, मज्जासंस्थेचे कार्य आणि डीएनए इत्यादी अनेक गोष्टींसाठी महत्वाचे ठरते. विटामिन बी १२ च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे फार धोक्याचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊया विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आणि विटामिन बी १२ वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

थुंकीतून रक्त येतं? फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसूनयेतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

विटामिन बी १२ ची कमतरता जाणवू लागल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • सतत थकवा जाणवणे, लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होणे.
  • अचानक उठून उभे राहिल्यावर चक्कर येणे.
  • त्वचा फिकट पडणे, भूक मंदावणे.
  • जीभ सुजणे किंवा लाल होऊन वारंवार तोंड येणे.
विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण हळूहळू शरीरात बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. विटामिन बी १२ ची पातळी गरजेपेक्षा खूप जास्त कमी झाल्यास मज्जासंस्था आणि मेंदूच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. हात-पायांना मुंग्या येणे, अवयव बधीर होणे, स्नायू कमकुवत होणे, चालताना अचानक तोल जाणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. विसरभोळेपणा वाढणे, अति-संभ्रमावस्था, तीव्र मानसिक विकार निर्माण होऊन संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम होतात. तर काहीवेळा रक्ताच्या गाठी निर्माण होऊन फुफ्फुसाचा एम्बोलिझम येऊन झटके येतात.

Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे:

डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोजच्या आहारात क्लॅम्स, शिपले, मासे, सॅल्मन, ट्युना, मॅकरेल, चिकन, अंडी, दूध, दही, चीज इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन बी १२ मिळते. फोर्टिफाइड वनस्पतीजन्य दूध, फोर्टिफाइड सिरियल्स आणि न्यूट्रिशनल यीस्ट इत्यादी पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. पण आहारात बदल करून सुद्धा शरीरात गंभीर लक्षणे दिसतअसतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हिटॅमिन B12 ची कमतरता झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हात-पाय बधिर होणे किंवा मुंग्या येणे, चक्कर येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, त्वचा फिकट पडणे आणि काही प्रकरणांमध्ये मज्जासंस्थेशी संबंधित समस्या दिसू शकतात.

  • Que: व्हिटॅमिन B12 कोणत्या पदार्थांमधून मिळते?

    Ans: दूध, दही, चीज, अंडी, मासे, चिकन, मटण, यकृत (लिव्हर) यांसारख्या प्राणिजन्य पदार्थांमध्ये B12 मुबलक प्रमाणात असते.

  • Que: व्हिटॅमिन B12 ची कमतरता कशी ओळखली जाते?

    Ans: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणीद्वारे B12 ची पातळी तपासली जाते. गरजेनुसार इतर रक्त तपासण्या देखील सुचवल्या जाऊ शकतात.

Web Title: Feeling weak due to vitamin b12 deficiency add these powerful foods to your diet to boost energy and reduce fatigue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • important vitamins
  • vitamin b12
  • vitamin deficiency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.