Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर

नैसर्गिक गोडव्याने समृद्ध असलेले अंजीर आणि खजूर शरीरासाठी उत्तम मानले जातात. शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या प्रकारचे दरयफ्रूट ड्राय फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो.अंजीर आणि खजूर यांच्या पौष्टिक मूल्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 02:20 PM
अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

नैसर्गिकरित्या गोड असलेले खजूर आणि अंजीर हे दोन्ही पोषक तत्वांचे भांडार आहेत. याचा वापर विविध गोड पदार्थांमध्येही केला जातो. दोन्ही पदार्थांना फायबरचा चांगला स्रोत मानले जातात, पण तुम्हाला माहित्ये का कशामध्ये जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात? अंजीर आणि खजूर यांच्या पौष्टिक मूल्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच, त्यांचे किती प्रमाणात सेवन करावे आणि त्यामुळे कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात हे देखील आपण आज समजून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, १०० ग्रॅम खजूरमध्ये २.४५ ग्रॅम प्रथिने असतात. एकूण ८ ग्रॅम डायटरी फायबर, ३९ मिलिग्रॅम कॅल्शियम, १.०२ मिलिग्रॅम लोह, ४३ मिलिग्रॅम मॅग्नेशियम, ६५६ मिलिग्रॅम पोटॅशियम, ६२ मिलिग्रॅम फॉस्फरस, ३ मायक्रोग्रॅम सेलेनियम, १.२७४ मिलिग्रॅम नियासिन, १९ मायक्रोग्रॅम फोलेट, ६.३ मिलिग्रॅम कोलीन, ७५ मायक्रोग्रॅम ल्युटीन-झियाझॅन्थिन आणि २.७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के आढळतात. तथापि, खजुराच्या प्रकारानुसार पोषक तत्वांचे प्रमाण बदलू शकते.

तर यूएसडीए (USDA) नुसार, १०० ग्रॅम अंजीरमध्ये ०.७५ ग्रॅम प्रथिने आणि २.९ ग्रॅम एकूण डायटरी फायबर असते. याव्यतिरिक्त, त्यात ३५ मिग्रॅ कॅल्शियम, १७ मिग्रॅ मॅग्नेशियम, ०.३७ मिग्रॅ लोह, १४ मिग्रॅ फॉस्फरस, २३२ मिग्रॅ पोटॅशियम, ०.१२८ मिग्रॅ मॅंगनीज, २ मिग्रॅ व्हिटॅमिन सी, ६ मायक्रोग्रॅम फोलेट, ४.७ मिग्रॅ कोलीन, ७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए, ९ मायक्रोग्रॅम ल्युटीन-झियाझॅन्थिन, ०.११ मिग्रॅ व्हिटॅमिन ई, आणि ४.७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असते.

आहारात खजुराचा समावेश केल्याने तुमची पचनक्रिया सुधारू शकते आणि ते लोहाची पातळी वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. तसंच नैसर्गिक गोडवा देणारे असल्याने ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. पण तुम्ही मधुमेही असाल, तर तुमच्या आहारात त्यांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खजुराचा समावेश करत असाल, तर दिवसातून २ ते ४ खजूर खाणे पुरेसे आहे.

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

याशिवाय आहारात अंजीराचा समावेश केल्याने तुमच्या पचनक्रियेला आणि हाडांना फायदा होतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई दोन्ही असल्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर आहेत आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच, ते व्हिटॅमिन ए चा स्रोत असल्याने तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरतात. जर तुम्ही ते रोज खाणार असाल, तर २ ते ३ तुकडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा. या संपूर्ण टिप्स अभ्यासानुसार देण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंजीर आणि खजूर यापैकी कोणते अधिक पौष्टिक आहे?

    Ans: दोन्हीमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. अंजीरमध्ये फायबर आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते, तर खजूरमध्ये नैसर्गिक साखर आणि पोटॅशियमसह ऊर्जा देणारे पोषक घटक असतात. त्यामुळे कोणते अधिक चांगले हे गरजेनुसार ठरते.

  • Que: अंजीर खाण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन पचनक्रिया आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • Que: खजूर खाण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: खजूरमध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम आणि काही जीवनसत्त्वे व खनिजे असतात. त्यामुळे तो झटपट ऊर्जा देणारा पौष्टिक पर्याय ठरू शकतो.

Web Title: Figs or dates which of the two dry fruits contains more nutrients find out in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Dry Fruits Benefits
  • fig benefits
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम
1

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
2

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
3

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
4

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.