हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी सवयी
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सतत कामातून थोडा वेळ काढत आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक आणि कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय हल्ली अनेकांना कमी वयातच हृदयविकाराचा झटका येतो. कमी वयात हृदयाचे आरोग्य खराब झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणे, नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल साचून राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता आरोग्याला फायदेशीर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयाचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करतात. मात्र डॉक्टरांच्या गोळ्या औषधांचे सतत सेवन करण्याऐवजी चांगल्या सवयी फॉलो करून आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयी नियमित फॉलो केल्यास हृदयाचे आरोग्य वयाच्या शंभरीमध्ये सुद्धा चांगले राहील. चला तर जाणून घेऊया.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठावे. 21 दिवस सकाळी ठरविक वेळेत उठल्यानंतर मेंदूला सवय होते, त्यामुळे नेहमीच तुम्ही सकाळी लवकर उठू लागता. सर्केडियम रिदन ब्रेन हे मेंदूमधील घड्याळ जे झोपेसोबतच आपलं बॉडी टेम्परेचर, भूक आणि हार्मोन्सला कंट्रोल करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मेंदूला होते.
हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी सवयी
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. कोमट पाण्यात असलेले प्रभावी गुणधर्म शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याचे सेवन करण्याऐवजी कोमट पाण्याचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर शरीराचे रक्तभिसरण मंदावते. शरीराचे मंदावलेले रक्तभिसरण सुधारण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, शरीरास हानिकारक असलेले विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर पडून जातात.
शरीर कायम निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर योगासने किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम, मॉर्निंग वॉक केल्यामुळे शरीराची हालचाल होते आणि शरीर सक्रिय राहते. नुलोम-विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायाम नियमित केल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, याशिवाय हृदयाला रक्तपुरवठा होण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर कोवळं ऊन अंगावर घेणे आवश्यक आहे. कोवळं ऊन अंगाला लागल्यामुळे विटामिन डी वाढून शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला नैसर्गिकरित्या विटामिन डी मिळाल्यामुळे शरीराची रोगांपासून रक्षण होते. याशिवाय हृदयविकाराच्या धोक्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटं कोवळ्या उन्हात चालणे आवश्यक आहे.
दुप्पट वेगाने वाढेल कोलेस्ट्रॉल, कधीही येऊ शकतो Heart Attack; चुकीच्या पद्धतीने खाल्ले जातेय तूप
दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात फळे, भाज्या, नट्स, पालेभाज्या, ओट्स, मोड आलेली कडधान्य इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यामध्ये साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. दैनंदिन आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.