रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' कच्च्या पदार्थाचे सेवन
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, अवेळी जेवणे, सतत धूम्रपान करणे, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर झाल्यानंतर मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही.त्यामुळे आहारात साखर युक्त पदार्थांचे सेवन न करता, कमी साखर युक्त पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरात असणाऱ्या इतर अवयवांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पिवळ्या फळाचे सेवन, लठ्ठपणा होईल कमी
मधुमेह झाल्यानंतर अनेक रुग्ण फळे, भाज्या, इत्यादी अनेक पदार्थ खाणे टाळतात. मात्र असे न करता आहारात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय हा आजार झाल्यानंतर कायमस्वरूपी गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. गोळ्या औषधांच्या अतिसेवनामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात कच्च्या केळ्यांचे सेवन करावे. कच्च्या केळ्यांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, विटामिन बी६, रेसिस्टंट स्टार्च इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कच्च्या केळ्यांचा वापर करून वेफर्स, भाजी, चिप्स इत्यादी पदार्थ बनवले जातात. कच्ची केळी खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते, लवकर भूक लागत नाही. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर आहारात कच्च्या केळ्यांचे सेवन करावे. कारण यामध्ये आढळून येणारे रेसिस्टंट स्टार्च आणि फायबर्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच या केळ्यांमुळे शरीरातील ग्लुकोज पातळी वाढत नाही.
सतत तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारामध्ये कच्च्या केळ्यांचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे फायबर आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवतात. याशिवाय बद्धकोष्ठतेचा समस्या कमी होते. रेसिस्टंट स्टार्च आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
3 महिन्यात Liver होईल परफेक्ट त्वरीत करेल काम; हेल्थ कोचने सांगितले कोणता चहा ठरेल रामबाण उपाय
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला आणि पुरुष सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी कच्च्या केळ्यांचे नियमित सेवन करावे. कच्च्या केळ्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही कॅलरीयुक्त पदार्थांचे आहारात सेवन करू शकता. कच्च्या केळ्यांचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.